Why do car tires burst?
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, बरेच चालक गाडीचं मेंटेनन्स वेळच्या वेळी करत असतात, पण टायरची देखभाल दुर्लक्षित करतात. त्यामुळे टायरच्या स्फोटाचं कारण आणि त्यापासून बचावाचं उपाय माहिती असणं आवश्यक आहे.
टायर फाटण्याची मुख्य कारणं:
1. चुकीचा हवा दाब (Tyre Pressure)
जास्त हवा (Overinflation) असलेला टायर उन्हाळ्यात जास्त तापतो आणि त्याचे साईडवॉल्स ताणले जातात, ज्यामुळे तो फाटतो.
कमी हवा (Underinflation) असलेला टायरही घासून घासून गरम होतो आणि त्याचा ब्लोआउट होण्याचा धोका वाढतो.
उपाय: नेहमी मॅन्युफॅक्चररने सांगितलेल्या PSI प्रमाणेच हवा भरावी.
2. ओव्हरलोडिंग (Overloading)
क्षमतेपेक्षा जास्त वजन टायरवर दाब टाकतं आणि गाडी वेगात असताना टायर फाटू शकतो.
3. जुने किंवा झिजलेले टायर
टायरचं आयुष्य साधारणतः 5–6 वर्षं किंवा 40,000–50,000 किमी असतं.
झिजलेल्या टायरमध्ये ग्रिप नसते आणि त्यातील रबर कडक होऊन क्रॅक पडतो, त्यामुळे ब्लोआउटची शक्यता वाढते.
4. उन्हाळी तापमान आणि वेगाचा परिणाम
उन्हात रस्त्याचं तापमान 50°C पेक्षा जास्त जातं. अशा वेळी टायरही गरम होतो आणि अधिक वेगात फाटण्याची शक्यता वाढते.
हे जरूर वाचा:- Important Documents while Buying Property : मालमत्ता खरेदीतील आवश्यक १३ कागदपत्रांची यादी.5. खड्डे, खिळे, टोकधार वस्तू आणि इलेक्ट्रीक करंट
खड्डे किंवा टोकधार वस्तू टायर फाडू शकते. जास्त वेगात खड्यात गाडी आदळल्यास टायरचा साईडवॉल तुटू शकतो.
6. टायर आणि रिम यामधील मिसमॅच किंवा चुकीची फिटिंग
टायर नीट बसला नसेल किंवा रिम खराब असेल तर टायरचा संतुलन बिघडून ब्लोआउट होऊ शकतो.
अशावेळी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं?
प्रत्येक टायरवर एक सिरियल नंबर आणि K ते Z पर्यंत एक अल्फाबेट असतो, जो त्या टायरची कमाल वेग मर्यादा दर्शवतो.
अक्षर कमाल वेग मर्यादा (kmph)
L 120
M 130
N 140
P 150
R 170
S 180
T 190
H 210
V 240
Z 240+
उदाहरणार्थ, टायरवर P असेल तर त्याचा कमाल वेग 150 किमी/तास इतका आहे. त्यामुळे गाडी चालवण्याआधी टायरवर ही माहिती नक्की तपासा.
हे जरूर वाचा:- Baby Girl Names in Marathi Starting with B : आपल्या बाळाच्या भविष्यासाठी अर्थपूर्ण व अद्वितीय नाव निवडा.
टायर फाटणं टाळायचंय? मग हे करा:
दर 10–15 दिवसांनी टायर प्रेशर तपासा.
5 वर्षांपेक्षा जुने टायर बदला.
गाडी ओव्हरलोड करू नका.
खड्डे किंवा खराब रस्त्यांवर वेग कमी ठेवा.
5,000–7,000 किमी झाल्यावर टायरचं रोटेशन करा.
टायर फाटल्यावर काय कराल?
घाबरू नका.
गाडीचं स्टिअरिंग सरळ ठेवा.
अचानक ब्रेक नका मारू. हळूहळू एक्सेलेटर सोडा.
शक्य तितक्या शांतपणे गाडी साइडला घ्या.