Header

Vicky Kaushal : एकेकाळी 1500 रुपये पगार घेणारा विकी कौशल आज बॉलिवूडमध्ये चमकतोय!

Vicky Kaushal : विकी कौशल, आपल्या 'छावा' चित्रपटाच्या यशाचा आनंद अनुभवत आहे. याच दरम्यान त्याने आपल्या संघर्षाचे दिवस आठवले. एकेकाळी चाळीत राहणारा आणि फक्त १५०० रुपये पहिला पगार असलेला विकी आज बॉलिवूडमध्ये चमकतोय!


एकेकाळी 1500 रुपये पगार घेणारा विकी कौशल आज बॉलिवूडमध्ये चमकतोय!

अ‍ॅक्शन दिग्दर्शक असलेले वडील असूनही, विकीने स्वतःच्या कष्टाने यश मिळवले आहे. त्याची कहाणी अनेकांसाठी प्रेरणा देणारी आहे. तो सांगतो, "मी ज्या चाळीत जन्मलो, तिथेच लहाणपण गेले. परिस्थिती कठीण होती, पण तेव्हा लहान असल्याने मला संघर्षाची तीव्रता कळत नव्हती. खरे तर माझे आई-बाबा त्या काळात खूप काही सहन करत होते."

विकी पुढे म्हणतो, "प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतात. माझी परिस्थिती कदाचित दुसऱ्यापेक्षा चांगली असेल किंवा त्यांची माझ्यापेक्षा. महत्वाचे म्हणजे आपण संकटांना कसे तोंड देतो आणि आयुष्यात पुढे कसे जातो."

हे जरूर वाचा:- Underbody Coating : कारला अंडरबॉडी कोटिंगचे लावण्याचे गुप्त फायदे! गंजाबरोबरच या भयानक समस्यांपासूनही ठेवेल तुमच्या गाडीला सुरक्षित!

विकीला नोकरीची ऑफऱ आली तेव्हा त्याच्या पालकांना खूप आनंद झाला. त्यांना वाटले आता त्यांच्या मुलाला स्थिर जीवन मिळेल. पण विकीला नोकरीच्या चौकटीत राहून काम करता येणार नाही हे माहित होते. चांगल्या नोकऱ्यांच्या ऑफर्स असूनही, त्याने मनाचा आवाज ऐकला आणि अभिनय क्षेत्र निवडले.

त्याच्या पहिल्या पगाराबद्दल बोलताना विकी कौशल म्हणतो, जेव्हा मी थिएटर करत होतो तेव्हा मला पगार म्हणून १५०० रुपयांचा चेक मिळाला होता. तो पुढे म्हणतो, 'त्यावेळी मी अभिनयात नाही तर निर्मितीत काम करायचो. मी पडद्यामागे काम करायचो.'

हे जरूर पहा:- औरंगजेबाच्या Zeenatunnisa मुलीचं पुढं काय झालं?

'शो संपल्यानंतर, मी माझ्या बॅगेत चेक घेऊन स्टेशनवर माझ्या ट्रेनची वाट पाहत उभा होतो. मी खूप घाबरलो होतो. मी ते घट्ट धरले होते, मला भीती होती की ते हरवेल. पण हो, ती माझी पहिली कमाई होती.'

आज विकी कौशल हे बॉलिवूडमधील मोठे नाव आहे. रिपोर्ट्सनुसार, एकेकाळी १५०० रुपये पगार घेणारा विकी आज एका चित्रपटासाठी २० कोटी रुपयांपर्यंत मानधन घेतो. १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या 'छावा' या चित्रपटात रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना हे देखील प्रमुख भूमिकेत आहेत.


जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.