Shivaji Maharaj Sinhasan : स्वराज्याचं स्वप्न पाहून ते सत्यात उतरवण्यासाठी शिवरायांनी मावळ्यांच्या मदतीने मुघल आणि अदिलशाहीला अनेक दशकं झुंजवलं. या संघर्षामध्ये शिवरायांप्रती इमान राखणाऱ्या हजारो मावळ्यांनी प्राणांची आहुती दिली. 6 जून 1674 रोजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. स्वराज्याचं प्रतिक म्हणून राजमुद्रा, शिवमुद्रा आणि स्वराज्याचं सिंहासन ओळखलं जाऊ लागलं.
सिंहासनाविषयी आणखी एक दंतकथा सांगितली जाते. हे सारं 1818 च्या काळात घडल्याचं सांगितलं जातं. विशेष म्हणजे हेच ते वर्ष आहे जेव्हा पेशवाई संपली आणि सर्व कारभार ब्रिटीशांच्या हाती गेला. रायगड ब्रिटीशांच्या ताब्यात जाण्याआधी रायगडावरील खंडोजी आणि यशवंता या सरदारांनी आपल्या साथीला काही निवडक माणसं घेतल्याचं सांगितलं जातं. या सगळ्यांनी सिंहासन लाकडी तराफ्यावर ठेऊन मेणा दरवाजापर्यंत नेलं. तिथून काळकाई खडग्यातल्या वाघ जबड्यात ते सिंहासन खाली उतरवण्यात आलं. तसेच हे जड सिंहासन पुढे घेऊन जाणं शक्य नसल्याने तिथेच ते पुरण्यात आल्याचं सांगण्यात येतं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचा स्वात्रंत्र्योत्तर काळातही शोध घेण्याचा प्रयत्न झाला. 1980-81 मध्ये सध्याची मेघडंबरी उभारण्याचं काम हाती घेतलं होतं. मेघडंबरीच्या उभारणीपूर्वी या ठिकाणी पुरातत्व खात्यानं उत्खनन हाती घेण्यात आलं. त्यावेळी तिथं सिंहासनाचा मूळ चौथरा सापडल्याचा दावा करण्यात येतो. त्या ठिकाणी एक शिवराई नाणंही सापडल्याचं अभ्यासक सांगतात.
हे जरूर वाचा:- Important Documents while Buying Property : मालमत्ता खरेदीतील आवश्यक १३ कागदपत्रांची यादी.
इतिहासात स्वराज्याच्या सिंहासनांबाबत वेगवेगळी माहिती मिळते. निश्चलपुरी गोसावी यांनी शिवाजी महाराजांचा तांत्रिक राज्याभिषेक केला. त्यांनी शिवराज्याभिषेक कल्पतरु नावाचा एक ग्रंथ लिहला. त्या ग्रंथातही सिंहासनाचं वर्णन आहे.
सिंहासनावर आठ सिंह कोरले होतं. स्वराज्याचं सिंहासन 32 मण सोन्यापासून बनलं होतं अशी माहिती समोर येते. त्या सिंहासनाबाबत सभासद बखरीतही सविस्तर उल्लेख पाहायला मिळतो.
मराठेशाहीचं तख्तही तसंच साजेसं हवं होतं. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकानंतर ज्या सिंहासनावर आरुढ झाले ते सिंहासन सोन्यापासून बनवलेलं होतं. सिंहासनाला हिरे, पाचू, माणिक आणि मौल्यवान रत्नांनी मढवलं होतं. या राज्याभिषेक सोहळ्याला हेन्री ऑक्झेंडन नावाचा इंग्रज अधिकारी आणि नारायण शेणवी नावाचा दुभाषा उपस्थित होता हेनरीच्या डायरीत राजसिंहासनाचा उल्लेख आढळतो.
हे जरूर वाचा:- Baby Boy Names in Marathi Starting with I : आपल्या बाळाच्या भविष्यासाठी अर्थपूर्ण व अद्वितीय नाव निवडा
मुघल साम्राज्याच्या वरवंट्याखाली संपूर्ण देश असताना सह्याद्रीनं स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं. हे स्वप्न शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवलं होतं. विजयनगरच्या साम्राज्यानंतर पहिल्यांदाच शिवाजी महाराजांच्या रुपानं हिंदवी साम्राजाला छत्रपती मिळणार होता. मराठा साम्राज्याची ओळख होती ते सिंहासन. म्हणजेच मराठा तख्त.
स्वराज्याचं प्रतिक म्हणजे शिवमुद्रा आणि स्वराज्याचं सिंहासन. स्वराज्याच्या सिंहासनाचं पुढं झालं काय? स्वराज्याची निशाणी असलेल्या सिंहासनाचा नंतर उल्लेखच इतिहासात आढळत नाही. 32 मण सोन्याचं हिरे पाचू माणिकांनी मढवलेल्या सिंहासनाचं पुढं काय झालं याची माहितीच मिळत नाही. गेली अनेक दशकं इतिहास संशोधक आणि शिवप्रेमी स्वराज्याच्या सिंहासनाचं काय झालं याचा शोध घेतायत.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.
Read Also,