Sachin Tendulkar : भारतीय क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने अनेक विक्रम केले आहेत. परंतु फार कमी लोकांना माहिती आहे की जेव्हा तो त्याच्या तरुण वयात होता तेव्हा तो मुलींपासून दूर पळायचा. ही घटना त्या काळातली आहे जेव्हा सचिन तेंडुलकर त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर होता आणि त्याला एका जाहिरातीची ऑफर मिळाली होती, पण त्या जाहिराती दरम्यान सचिन सोबत असं काही झालं जे तो आजही विसरू शकलेला नाही. सचिन सोबत नेमकं काय घडलं जाणून घ्या.
सचिन तेंडुलकर घरी जायला का निघाला?
सचिन तेंडुलकरला एका जाहिरातीची ऑफर देण्यात आली होती जी त्याने स्वीकारली देखील होती पण त्या दरम्यान असं काही घडलं ज्याने थेट सचिन घरी जायचं बोलू लागला. सचिनला पेप्सीने करारबद्ध केले. पेप्सीने एक स्पर्धा आयोजित केली होती आणि म्हटले होते की जो कोणी ही स्पर्धा जिंकेल त्याला भारतीय क्रिकेट संघासोबत बसण्याची संधी मिळेल. सचिन या इंडस्ट्रीत नवीन होता आणि चित्रपट आणि जाहिरात निर्माते प्रल्हादने सचिनसोबत प्रॅन्क केला.
हे जरूर वाचा:- Important Documents while Buying Property : मालमत्ता खरेदीतील आवश्यक १३ कागदपत्रांची यादी.
प्रल्हादने केला सचिन तेंडुलकरसोबत प्रॅन्क
सायरस ब्रोचाला दिलेल्या मुलाखतीत प्रल्हाद म्हणाला, "मी सचिनला सांगितले होते की ही स्पर्धा एक मुलगी जिंकेल आणि त्याला त्या मुलीला भारतीय क्रिकेट संघात घेऊन जावे लागेल, तेही तिच्या खांद्यावर हात ठेवून. सचिन घाबरला आणि म्हणाला, 'नाही, मी हे करू शकत नाही.' म्हणून मी म्हणालो, 'का नाही?' तो म्हणाला, 'कारण मी कधीही मुलीला पकडले नाही.यानंतर, जेव्हा प्रल्हादने सचिनला विचारले की त्याच्या शाळेत मुली आहेत का, तेव्हा सचिनने सांगितले की तो शाळेत कधीही कोणत्याही मुलीशी बोलला नव्हता. "तो नाराज झाला आणि म्हणाला, 'नाही, मी ही जाहिरात करू शकत नाही. मी घरी जात आहे, "प्रल्हाद हसत म्हणाला. मग मी त्याला सांगितले की मी मस्करी करत होतो.”
सचिन तेंडुलकर हा क्रिकेट विश्वातील असा खेळाडू आहे ज्याला अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक क्रिकेटप्रेमी ओळखतो. त्याने क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर सचिन तेंडुलकर भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आहेत आणि त्यांना 'क्रिकेटचा देव' म्हणून ओळखले जाते. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत आणि अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत, जसे की सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतके आणि सर्वाधिक सामने खेळणे. याशिवाय त्याने डोमेस्टिक लेवलला देखील उत्तम कामगिरी केली आहे.