IRCTC : सध्या उन्हाळा सुट्ट्या सुरू आहेत. त्यामुळे अनेकजण सुट्यांचा आनंद घेण्यासाठी कुटुंब, मित्र-मैत्रिणींच्यासोबत गावी, फिरायला जाण्याचा बेत आखत असणारच. मात्र प्रवासात सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतोय, तो म्हणजे फिरायला कशाने जायचं? तुम्हाला तर माहित आहेच की, एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी रेल्वे हे सर्वात महत्त्वाचं आणि किफायतशीर माध्यम आहे. मात्र प्रवासादरम्यान सर्वात मोठा अडथळा ठरतोय तो रेल्वेचं तिकीट बुक करण्याचा. तुम्ही देखील रेल्वेने फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर चला तर जाणून घरीच बसून कसे रेल्वेचे तिकीट बुक कराल?
सुट्टीच्या काळात रेल्वेच्या तिकिटांना प्रचंड मागणी असते. बुकिंग सुरू होताच, काही मिनिटांतच सर्व तिकिटं भरून जातात. अशा वेळी अनेक प्रवासी तात्काळ तिकिटांची वाट पाहतात. पण अनेकदा असं होतं की, तात्काळ तिकीटसुद्धा मिळत नाही, आणि प्रवाशांना शेवटी जनरल तिकीट घेऊन प्रवास करावा लागतो, किंवा पर्यायी मार्ग म्हणून खाजगी कार बुक करून अधिक पैसे मोजावे लागतात.
मात्र, आता आम्ही तुम्हाला एक सोपं आणि कायदेशीर ऑनलाईन स्टेप सांगणार आहोत, ज्यामुळे तात्काळ तिकीट मिळण्याची शक्यता वाढू शकते. हे कोणतंही अनधिकृत किंवा फसवणुकीचं माध्यम नाही, तर ऑनलाईन पेमेंट प्रक्रियेतील एक महत्त्वाचं पाऊल आहे, जे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पाहू शकता.
रेल्वेचं तात्काळ तिकीट बुकिंग करणं म्हणजे एक स्पर्धा जिंकल्यारखंच आहे. लाखो प्रवासी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी तात्काळ कोट्यातील तिकिटं मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, या प्रक्रियेत सर्वसामान्य प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रवासी झपाट्याने बुकिंग डिटेल्स भरून पुढे जातात आणि लगेचच पेमेंट मोड निवडतात. काहीजण डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरतात, तर काहीजण यूपीआय पेमेंटसारखे पर्याय निवडतात. अनेक वेळा IRCTC अॅप किंवा वेबसाइट, थर्ड पार्टी अॅप्स जसे की पेटीएम, फोनपे यांच्यावर रीडायरेक्ट करते. याच दरम्यान, पेमेंट पूर्ण होईपर्यंत काही महत्त्वाचे सेकंद वाया जातात, आणि त्याच वेळी सर्व तिकीटं फुल होतात. परिणामतः, प्रवाशाच्या हाती उरते ती फक्त वेटिंग लिस्टची तिकिटं, आणि तात्काळ बुकिंगचं स्वप्न अपूर्ण राहतं.
हे जरूर वाचा:- fitness mantra : 'व्यायामाचं गणित' आणि 'घाम पुराण'.
तात्काळ तिकिटांसाठी IRCTC eWallet ठरू शकते वरदान
प्रवाशांना तात्काळ रेल्वे तिकीट बुकिंग करताना सतत अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, आता या समस्येवर एक सोपा आणि अधिक सुरक्षित पर्याय उपलब्ध आहे. तो म्हणजे आयआरसीटीसी वॉयलेट (IRCTC eWallet). IRCTC eWallet म्हणजे आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेलं एक डिजिटल वॉलेट, जे अगदी पेटीएम वॉलेटप्रमाणे कार्य करतं. या वॉलेटमध्ये प्रवासी आधीच रक्कम भरून ठेवू शकतात, जी तिकीट बुकिंग करताना थेट वापरता येते. IRCTCचा दावा आहे की, या eWallet चा वापर केल्यास पेमेंटवेळी कोणतीही अडचण येत नाही आणि व्यवहार पूर्णतः सुरक्षित आणि जलद होतो. याशिवाय, प्रत्येक बुकिंगवेळी लागणारे पेमेंट गेटवेचे अतिरिक्त शुल्क देखील वाचते. प्रवासी या वॉलेटला पूर्वीच टॉपअप करून ठेवू शकतात, जेणेकरून तिकीट बुक करताना एकही सेकंद न दवडता थेट रक्कम वळती करता येते आणि तिकीट मिळण्याची शक्यता अधिक वाढते.
हे जरूर वाचा:- Baby Girl Names in Marathi Starting with E : आपल्या बाळाच्या भविष्यासाठी अर्थपूर्ण व अद्वितीय नाव निवडा
IRCTC ई-वॉलेट अॅक्टिवेट कसं कराल?
IRCTC तात्काळ तिकिटं बुक करताना वेळ वाचवण्यासाठी आणि सुरक्षित पेमेंटसाठी IRCTC eWallet एक उपयुक्त पर्याय आहे. हा ई-वॉलेट वापरण्यासाठी सर्वप्रथम तो अॅक्टिवेट करणं गरजेचं आहे. खालील स्टेप्सद्वारे तुम्ही तुमचं IRCTC ई-वॉलेट सहज सुरू करू शकता.
- IRCTC चं अधिकृत अॅप किंवा वेबसाईट वापरून तुमच्या IRCTC खात्यात लॉग-इन करा.
- ‘My Account’ वर जा : अॅपमध्ये खाली ‘My Account’ हा पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा.
- ‘My Profile’ मध्ये ‘IRCTC eWallet’ निवडा : My Profile च्या खाली IRCTC eWallet चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक/टॅप करा.
- ‘Register Now’ किंवा ‘Reactivate’ निवडा : पुढे तुम्हाला ‘Register Now’ किंवा ‘Reactivate’ हे दोन पर्याय दिसतील. आवश्यकतेनुसार क्लिक करा.
- KYC प्रक्रिया पूर्ण करा : तुमचा आधार कार्ड किंवा PAN कार्ड वापरून प्रमाणीकरण (Authentication) करा.
- वॉलेटमध्ये रक्कम भरा : एकदा वॉलेट अॅक्टिवेट झाल्यानंतर, तुम्ही त्यात ₹10,000 पर्यंत रक्कम जमा करून ठेवू शकता.
ई-वॉलेटचे 'हे' आहेत फायदे
- तात्काळ किंवा सामान्य बुकिंगमध्ये कन्फर्म तिकिटं मिळवण्याची शक्यता अधिक असते
- व्यवहार पूर्णतः सुरक्षित आणि पारदर्शक असतो
- फसवणुकीची शक्यता नसते
- पेमेंट प्रोसेस जलद पूर्ण होते, ज्यामुळे तिकीट बुकिंगसाठी लागणारा वेळ वाचतो
- प्रत्येक तिकिटावर लागणारा पेमेंट गेटवेचा अतिरिक्त शुल्क ई-वॉलेट वापरताना लागत नाही
- ई-वॉलेट अकाउंट ऑनलाइन सहज मॅनेज करता येतो. अॅपमध्ये संपूर्ण ट्रांजॅक्शन हिस्ट्री उपलब्ध असते, ज्यामध्ये वापरकर्त्याने केव्हा, किती रुपयांचं तिकिट बुक केलं याची स्पष्ट माहिती मिळते
- अनेक वेळा बँकेच्या पेमेंट गेटवेवर अडथळे येतात, मात्र अशावेळीही ई-वॉलेटद्वारे तिकीट यशस्वीपणे बुक करता येतं.