Header

Brushing After Before Drinking Water : सकाळी उठल्यावर कधी पाणी प्यावं, ब्रश करण्याआधी का नंतर? कोणती पद्धत योग्य?

Brushing After Before Drinking Waterसकाळी ब्रश करणं हे नित्याचं काम आहे. त्याच्याशिवाय लोक चहा नाष्टा करत नाहीत. तोंड साफ करणं हे सेल्फ हायजिनचा महत्वाचा भाग आहे. हे करणं गरजेचं देखील आहे. पण अनेकांना यासंबंधीत एक प्रश्न नक्कीच मनात येतो.


Brushing After Before Drinking Water : सकाळी उठल्यावर कधी पाणी प्यावं, ब्रश करण्याआधी का नंतर? कोणती पद्धत योग्य?

तो म्हणजे पाणी कधी प्यावं? सकाळी उठल्यावर ब्रश न करता पाणी प्यायलं तर चालतं का किंवा हे ओरल हायजिनच्या दृष्टीने किती चांगलं आहे?

काही जण असं म्हणतात की रिकाम्या पोटी आणि ब्रश केल्या शिवाय पाणी प्यावं ज्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. पण अनेकांचं असं म्हणनं आहे की ब्रश न करता पाणी प्यायलो तर तोंडातील जंत पोटात जातील ज्यामुळे ते शरिरासाठी हानिकारक ठरेल. अशावेळी लोक संभ्रमात पडले आहेत की नक्की काय? चला यासंदर्भात थोडं जाणून घेऊ.

झोपेत असताना शरीरात पाण्याची कमतरता होते. त्यामुळे सकाळी उठल्यावर पाणी पिणे पचनक्रियेस मदत करते आणि टॉक्सिन्स बाहेर टाकते.

ब्रश करण्यापूर्वी पाणी प्यायल्याने काय फायदे होतात? पचनक्रिया सुधारते, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात, त्वचा चमकदार होते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

हे जरूर वाचा:- Baby Girl Names in Marathi Starting with I : आपल्या बाळाच्या भविष्यासाठी अर्थपूर्ण व अद्वितीय नाव निवडा

ब्रश केल्यानंतर पाणी प्यायल्याने काय होते? ब्रश केल्यावर तोंडातील नैसर्गिक लाळ नष्ट होते. ही लाळ पचनासाठी उपयुक्त असते. त्यामुळे ब्रशपूर्वी पाणी पिणे अधिक फायदेशीर मानले जाते.

ब्रश करण्याआधी किती पाणी प्यावे? 1-2 ग्लास कोमट पाणी प्यायल्यास शरीराला अधिक फायदे होतात.

कोणत्या वेळी पाणी पिऊ नये? जेवणाच्या लगेच आधी किंवा नंतर पाणी पिऊ नये, कारण यामुळे पचनावर परिणाम होतो.

हे जरूर वाचा:- Motivational Story in Hindi : जीवन की सबसे बड़ी सिख देने वाली मोटिवेशनल स्टोरी

सकाळी पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती? उठल्यावर आधी पाणी प्या, 15-20 मिनिटांनी ब्रश करा, ब्रश केल्यानंतर पाणी प्यायचे असल्यास थोड्या वेळाने घ्या.

पण एक गोष्ट लक्षात ठेवा सकाळी ब्रश न करता पाणी पिण्यासाठी रात्री ब्रश करुन झोपणं गरजेचं आहे. तुमची ओरल हेल्थ चांगली असेल तर जंतू तोंडात रहाणार नाहीत आणि हेल्दी बॅक्टेरीया तयार होतील. ज्याचा शरीराला फायदाच मिळेल.

Disclaimer: हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. तो एक व्यावसायिक सल्याचा पर्याय, निदान किंवा उपचार नाही. तुम्हाला कोणताही आजार असल्यास, कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच कोणताही निर्णय घ्या.


जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.


Read Also,


Pahalgam Terror Attack : …जेव्हा ताजमहाल केला होता गायब, 1971 च्या युद्धात भारतानं पाकिस्तानला कसं फसवलं होतं?


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.