Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत बदला गेतला आहे. भारताने पाकव्याप्त काश्मीर तसेच पाकिस्तामधील वेगवेगळ्या 9 दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यात आलं आहे. 6-7 मे च्या रात्री भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं आहे. दरम्यान, 7 मे रोजी देशभरात मॉक ड्रिल करण्यात आलं. युद्धजन्य स्थिती नागरिकांनी स्वत:चे संरक्षण कसे करावे हे सांगण्यात आले. दरम्यान, भारताने 1971 सालच्या युद्धात ताजमहालला वाचवण्यासाठी मोठी शक्कल लढवली होती.
भारताने 6-7 मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर राबवलं. या ऑपरेशननंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध चालू होण्याची शक्यता वाढली आहे. हीच शक्यता लक्षात घेऊन भारताने अगोदरच भारतीय नागरिकांना मॉक ड्रिलच्या माध्यमातून स्वत:ची काळजी कशी घ्यावी, याची माहिती दिली आहे. तर दुसरीकडे भारतीय सेना हायअलर्टवर आहे. अशा स्थितीत भारताने राबवलेल्या मॉक ड्रिलला चांगलेच महत्त्व आले आहे. 1971 सालीदेखील अशाच प्रकारे मॉक ड्रिल राबवण्यात आली होती. 1971 साली भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्ध झालं होतं. तेव्हा करण्यात आलेल्या मॉक ड्रिलमुळे भारतीयांना स्वत:चे संरक्षण करण्यासाठी फार मदत झाली होती.
ताजमहालवर हल्ल्याची होती भीती
भारत आणि पाकिस्तानच्या 1971 सालच्या युद्धात ताजमहालला लक्ष्य करण्याची भीती होती. हीच शक्यता लक्षात घेऊन भारताने 1971 सालच्या युद्धात ताजमहालला तब्बल 15 दिवस झाकून ठेवलं होतं. पाकिस्तानने ताजमहालला लक्ष्य करू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. पांढऱ्या संगमरवराचा हा ताजमहाल फार उंच आहे. त्यामुळे उंचावरून ताजमहाल लगेच दिसून येतो. त्यामुळे शत्रू राष्ट्राला भारतावर हल्ला करणे सोपे होझाले असते. हीच बाब लक्षात घेता पूर्ण ताजमहाल हिरव्या कपड्याने झाकण्यात आला होता. तसेच ताजमहालाच्या आसपासच्या भागाला झाडांनी, फांद्यांनी झाकण्यात आले होते. त्या काळात ताजमहाल परिसरात पर्यटकांवरही बंदी घालण्यात आली होती. ताजमहाल अशा स्थितीत साधारण 15 दिवस होता.हे जरूर वाचा:- Manus : 'मानुस' खऱ्या माणसाची जागा घेईल?
यावेळीही ताजमहालला झाकण्यात येणार का?
भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले आहे. या ऑपरेशनअंतर्गत दहशतवाद्यांचे एकूण 9 तळ उद्ध्वस्त करण्यात आले. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तानने थयथयाट केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरला ‘अॅक्ट ऑफ वॉर’ म्हटलं आहे. अशा स्थितीत पाकिस्तानने भारताविरोधात युद्ध छेडलं तर ताजमहालला पुन्हा एकदा झाकण्यााच प्रयत्न केला जाऊ शकतो. सध्यातरी उत्तर प्रदेश सरकारने ताजमहाल झाकण्याचा कोणताही आदेश दिलेला नाही. पण भविष्यात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली तर तसा आदेश दिला जाऊ शकतो.Read Also,