Auto News Car - भारतात सध्या कार खरेदीचं जणू वारं वाहत आहे आणि यास कारणीभूत ठरत आहे तो म्हणजे केंद्राच्या वतीनं घेण्यात आलेलाय एक निर्णय. केंद्र सरकारच्या जीएसटी परिषदेनं मूळ कराच्या दरांमध्ये काही बदल केले असून, त्यामुळं अनेक कारचे दर कमी झाले आहेत. इतके, की सामान्यांच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या या कार आता आपणही खरेदी करू शकतो असं स्वप्न काही मंडळी पाहत आहेत, तर काहींनी त्यासाठीच्या पैशांची जुळवाजुळवही सुरू केली आहे. मुख्य म्हणजे भरमसाट कर्जाचा भार यामुळं वाढत नसल्यानं ही बाबसुद्धा सामान्यांना दिलासा देऊन जात आहे.
देशातील सर्वात स्वस्त कार...
मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडनं एरिना आणि नेक्सा डिलरशिपवर विक्री केल्या जाणाऱ्या सर्व कारचे नवे दर घोषित केले आहेत. कंपनीनं ग्राहकांना आश्चर्याचा धक्का देत हे दर 1.30 लाख रुपयांव आणले असून, कमाल बाब ही आहे, की ऑल्टो ही कार K10 पेक्षाही अधिक स्वस्त असल्यानं देशातील एक कमाल कार ठरत आहे, मात्र जीएसटी 2.0 मुळं मारुती कंपनीच्या कारवर मोठा परिणाम दिसून येत असून, (Maruti S-Presso ) एस-प्रेसो ही नवी एंट्री लेवल कार ठरत आहे. या मायक्रो एसयुव्हीची प्रारंभिक किंमत 3.49 लाख रुपये असून, नव्या ऑल्टोची किंमतही याहून अधिक म्हणजेच 3.69 लाख रुपये इतकी आहे. म्हणजे या दरांमध्येही 20 हजारांचा फरक दिसत आहे.
मायलेज आणि कारचे इतर फिचर...
मारुतीची एसप्रेसो कार 8 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून, तिचं बेस मॉडेल STD आणि टॉप व्हेरिएंट VXI CNG मध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये 1 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं असून त्यातून 68PS पॉवर आणि 90Nm टॉर्क जनरेट होतो. ही 5 स्पीड मॅन्युअर आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देणआरी कार असून, तिच्या सीएनजी वर्जनमध्ये फक्त मॅन्युअल गिअरबॉक्स उपलब्ध आहे. या कारचं पेट्रोल व्हेरिएंट 24.12 ते 25.30 प्रति लीटर इतकं मायलेज देतं. तर, सीएनजी व्हेरिएंट 32.73 किमी प्रति किग्रॅ इतकं मायलेज देतं असा दावा कंपनी करते.
हे जरूर वाचा:- Baby Girl Names in Marathi Starting with H : आपल्या बाळाच्या भविष्यासाठी अर्थपूर्ण व अद्वितीय नाव निवडा
कारचे इतर फिचरही पैसा वसूल!
मरुती एसप्रेसो ही कार में 7-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम, कीलेस एंट्री, सेमी-डिजिटल क्लस्टर, डुअल एयरबॅग, रियर पार्किंग सेंसर, हिल होल्ड असिस्ट आणि ABS+EBD असे फिचर्स देण्यात येतात. कमी आणि किफायतशीर बजेटमध्ये येणारी ही कार सामान्यांसाठी एक चांगली कार खरेदी करण्यात एक उत्तम पर्याय ठरत आहे. त्यामुळं लहानशा कुटुंबाला लहानशी आणि सुरेख कार घ्यायची असेल तर एस्प्रेसो हा एक चांगला पर्याय आहे.
FAQ
एस-प्रेसोची किंमत किती आहे?
नवीन किंमत ₹3.50 लाखांपासून (STD), टॉप ₹5.80 लाख (CNG). 22 सप्टेंबरनंतर हे नवे सुधारित दर लागू होणार आहेत.
जीएसटी बदल कधी लागू होईल?
22 सप्टेंबर 2025 हे बदल लागू होणार असून, छोट्या कारवर 18% जीएसटी, बचत 50000 ते 1.30 लाख इतकी बचत होत आहे.
एस्प्रेसोमध्ये मायलेज किती मिळते?
पेट्रोल: 24-25 किमी/लिटर, CNG: 32.73 किमी/किलो, इतकं मायलेज ही कार देते.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.
Read Also,
Vitamin Deficiency : पुरुषांमध्ये दिसणारे हे बदल घेऊ नका हलक्यात, व्हिटॅमिनच्या कमतरतेचे असते लक्षण
.jpg)