Header

Eating Peanut Disadvantages: उठसूट कधीही शेंगदाणे खाणं आता थांबवा नाहीतर शरीराला भोगावे लागू शकतात हे गंभीर परिणाम

Eating Peanut Disadvantages: शेंगदाणे खाण्यास तुमच्यापैकी अनेकांना आवडत असेल, यात शरीरास आवश्यक असे पोषक घटक आढळतात, त्यामुळे हिवाळ्यात शेंगदाण्याचे अधिक प्रमाणात सेवन केले जाते. याशिवाय काही जण ऑफिस किंवा प्रवासादरम्यानही टाइमपास म्हणून शेंगदाणे खातात. सर्वसाधारणपणे शेंगदाण्याचे सेवन आरोग्यदायी असते, कारण त्यात भरपूर आवश्यक अमिनो ॲसिड, जीवनसत्त्वे ई, रिबोफ्लेविन, बी ९ आणि भरपूर अँटीऑक्सिडंट्स आणि फिनॉल असते. याशिवाय फायबर, मोनो आणि पॉली-अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडस्, ओमेगा -३ फॅटी ॲसिडस्, खनिजे आणि आवश्यक अमिनो ॲसिडस् असते. हे घटक यकृत निरोगी ठेवण्यास मदत करतात. पण, इतर कोणत्याही अन्नपदार्थाप्रमाणे शेंगदाण्याचे जास्त प्रमाणात सेवन करणे तुमच्या आरोग्यावर विविध प्रकारे घातक ठरू शकते. चला तर मग आज आपण जाणून घेऊया शेंगदाणे खाण्याचे दुष्परिणाम…


Eating Peanut Disadvantages: उठसूट कधीही शेंगदाणे खाणं आता थांबवा नाहीतर शरीराला भोगावे लागू शकतात हे गंभीर परिणाम

Eating Peanut Disadvantages

शेंगदाणे खाणं आरोग्यासाठी घातक

अ‍ॅलर्जी असलेले लोक

शेंगदाण्यामुळे अ‍ॅलर्जी होणे ही एक सामान्य समस्या आहे. शेंगदाणे खाल्ल्याने त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे, जुलाब होणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो; म्हणून जर तुम्हाला शेंगदाणे खाल्ल्यानंतर पुरळ किंवा सूज आली असेल तर तुमच्या आहारात शेंगदाण्यांचा वापर करू नका.

वजन कमी करणारे लोक

शेंगदाणे हे प्रथिने, चरबी आणि फायबरचे चांगले स्रोत आहेत, परंतु ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढू शकते, म्हणून जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल किंवा जास्त वजन असेल तर शेंगदाणे कमी प्रमाणात खा.

हे जरूर वाचा:- Gym विसरा! भिंतीला होल न पाडता घरच्या घरी Pull-Ups कसे करावेत? (Ultimate Home Workout Guide) 💪

उच्च रक्तदाब असलेले लोक

जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्ही शेंगदाणे खाणे टाळावे. शेंगदाण्यांमध्ये सोडियमचे प्रमाण कमी असले तरी ते मिठासोबत खाल्ल्याने उच्च रक्तदाब होऊ शकतो. जर तुम्हाला उच्च रक्तदाब असेल तर मिठासोबत शेंगदाणे खाणे टाळा.

अॅसिडिटीचा त्रास असलेले लोक

शेंगदाण्यांमध्ये ओमेगा-६ जास्त असते, परंतु ओमेगा-३ कमी असते; त्यामुळे ते शरीरात निरोगी फॅटी अॅसिडचे असंतुलन निर्माण करू शकतात आणि अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

हे जरूर वाचा:- Can Blockchain Really Fix the Broken Insurance System?

खनिज शोषणात अडथळा

शेंगदाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत, परंतु ते शरीरातील खनिजांचे शोषण रोखू शकतात. शेंगदाण्यामध्ये आढळणारे फायटिक आम्ल झिंक, लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे शोषण रोखते. ते आतड्यांमध्ये जळजळ आणि अॅलर्जिक प्रतिक्रियादेखील निर्माण करू शकतात.

यकृतासाठी घातक

शेंगदाणे जास्त प्रमाणात खाल्ल्याने अफलाटॉक्सिन हे एक विषारी रसायन तयार होते, ज्यामुळे यकृताला हानी पोहोचू शकते; अशाने यकृताच्या कर्करोगाचाही धोका वाढतो, त्यामुळे शरीरात अफलाटॉक्सिनचे प्रमाण वाढू नये यासाठी शेंगदाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे.


जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल. 


Read Also,


Penalty for exceeding sanctioned electricity load: AC और इंडक्शन चलाने वाले सावधान! घर पहुंच सकता है बिजली विभाग का नोटिस और लग सकता है जुर्माना, जानिए क्यों


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.