कोणती स्कूटर अधिक स्वस्त झाली?
GST कमी झाल्याने कोणती स्कूटर अधिक स्वस्त झाली? Jupiter की Activa? समजून या या गाड्यांवर आधी किती जीएसटी होता? आता किती आकारला जाणार आहे आणि त्यामुळे किंमत कितीने कमी होणार आहे?
सर्वाधिक पसंती असलेल्या दोन स्कूटर
भारतीय ग्राहकांमध्ये सर्वात लोकप्रिय नॉन गेअर दुचाकींमध्ये होंडा अॅक्टिव्हा आणि टीव्हीएस ज्युपिटरची नावं आवर्जून घेतली जातात. परडवणारी किंमत आणि विश्वासार्हता या दोन पातळ्यांवर सर्वाधिक पसंती असलेल्या या दोन दुचाकी अगदी ग्रामीण भागापासून ते शहरांपर्यंत सगळीकडेच या दोन गाड्या सहज पाहायला मिळतात.
जीएसटीमध्ये कपात केल्याने किमती कमी
केंद्र सरकारने जीएसटीमध्ये कपात केल्याने दुचाकींच्या किमती कमी झाल्या आहेत. आजपासून म्हणजेच 22 सप्टेंबरपासूनच कमी दरातील जीएसटीअंतर्गत नवीन किंमती लागू होणार आहेत. त्यामुळे आजपासून होंडा अॅक्टिव्हा आणि टीव्हीएस ज्युपिटरच्या किमतीही कमी झाल्या आहेत.
नेमकी कोणती स्कूटर अधिक स्वस्त झाली?
मात्र आता प्रश्न असा आहे की या दोन लोकप्रिय स्कूटर्सपैकी नेमकी कोणती स्कूटर अधिक स्वस्त झाली आहे? कोणत्या स्कूटरच्या किमतीत मोठी कपात झाली आहे? नवीन स्कूटर खरेदी करण्याचा विचार असेल तर कोणती स्कूटर अधिक स्वस्तात मस्त पर्याय ठरु शकते? याच साऱ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात...
हे जरूर वाचा:- Cough Problem Solution : सर्दी, जुकाम, पुरानी खांसी और छाती की बलगम को दूर करेगा यह घरेलू नुस्खा
आजपासून किमती कमी
केंद्र सरकारने कार, मोटारसायकल आणि स्कूटरवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय साधारण सप्टेंबरच्या सुरुवातीलाच जाहीर केला. हा निर्णय आजपासून लागू झाला आहे. याचा अर्थ असा की स्कूटरच्या किमतीही आजपासून कमी झाल्या आहेत.
नवीन बदलांनुसार जीएसटी कसा?
नवीन बदलांनुसार, 350 सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकी वाहनांवर आता 18 टक्के जीएसटी आकारला जाईल. पूर्वी, या वाहनांवर 28 टक्के जीएसटी आणि 1 टक्के सेस लावला जात होता, ज्यामुळे त्यांच्या किमती वाढल्या होत्या. जीएसटीमध्ये कपात झाल्यानंतर, कंपन्या त्यांच्या लोकप्रिय मॉडेल्सच्या किमती सतत कमी करत आहेत.
होंडा अॅक्टिव्हा लोकप्रिय का?
होंडा अॅक्टिव्हा ही भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटरपैकी एक आहे. उत्तम कामगिरी, जबरदस्त मायलेज आणि कमी देखभाल लागत असल्याने ही दुचाकी सर्वसामान्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.
होंडा अॅक्टिव्हाची किंमत कितीने कमी झाली?
आतापर्यंत, होंडा अॅक्टिव्हावर 28 टक्के जीएसटी लागत होता. ज्यामुळे होंडा अॅक्टिव्हा किंमत ₹81,045 इतकी होती. मात्र आता त्यावर फक्त 18 टक्के जीएसटी लागणार आहे. जीएसटी कपातीमुळे, कंपनीने किंमत ₹7874 ने कमी केली आहे. ज्यामुळे आजपासून होंडा अॅक्टिव्हा ग्राहकांना ₹73,171 या किंमतीत उपलब्ध होणार आहे.
हे जरूर वाचा:- Hands-free car kit : पुरानी कार को स्मार्ट बनाएं मिनटों में! ये गैजेट देखकर चौंक जाएंगे आप!
सर्वात मोठी प्रतिस्पर्धी
टीव्हीएस ज्युपिटरबद्दल बोलायचे झाल्यास अॅक्टिव्हाची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी असणारी ही दुचाकीही प्रचंड लोकप्रिय आहे. ग्रामीण आणि शहरी भागातही टीव्हीएस ज्युपिटरची विक्री उत्तमप्रकारे होते.
कितीने स्वस्त झाली ज्युपिटर?
आतापर्यंत, टीव्हीएस ज्युपिटरवर 28 टक्के जीएसटी लागत होता, ज्यामुळे त्याची किंमत ₹78,631 झाली आहे. आजपासून म्हणजेच 22 सप्टेंबरपासून, त्यावर 18 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. ज्यामुळे या स्कूटरची किंमत ₹70,767 पर्यंत खाली येऊ शकते. याचा अर्थ किंमत ₹7,864 ची कपात होऊ शकते.
किमतीच्या बाबतीत कोणती गाडी परवडते?
अशाप्रकारे, दोन्ही स्कूटरच्या किमतीत जवळपास समान कपात झाली आहे. तथापि, किमतीच्या बाबतीत, ज्युपिटर ही अॅक्टिव्हापेक्षा अधिक परवडणारी स्कूटर आहे, असं किंमत पाहिल्यावर स्पष्ट होतंय.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.
Read Also,
.jpg)