हॅमर मिसाईलची किंमत किती?
हॅमर मिसाईल ही एक एक्यूरेट गाइडेड मिसाईल असून यामुळे अतिशय सहजपणे एयर टू ग्राउंडवर अटॅक केला जाऊ शकतो. भारताने पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूरला राबवत असताना हॅमर मिसाईलचा उपयोग केला. हॅमर मिसाईल ही आधुनिक लढाऊ विमान असलेल्या राफेलला फिट होते. हॅमर मिसाईल भारतीय सैन्याला अजूनच ताकदवर बनवते.हॅमर मिसाईलच्या किंमतीबाबत बोलायचं झालं तर याची किंमत ही 85,000 यूरो पासून 1.5 लाख यूरोपर्यंत म्हणजेच 70 लाख रुपयांपासून ते 1.2 कोटी रुपयांपर्यंत आहे. हॅमर ही एक फ्रांसीसी मिसाईल असून ज्याचं संपूर्ण नाव हे Highly Agile Modular Munition Extended Range मिसाईल असं आहे. ही मिसाईल 50 ते 70 किलोमीटर अंतरावरील लक्ष्यांवर हल्ला करू शकते.
हे जरूर वाचा:- Gold Rate Future India : बापरे सोन्याची लकाकी वाढली.
हॅमर मिसाईलची वैशिष्ट्य :
हॅमर मिसाईलमध्ये जीपीएस सुद्धा असतं. यात लेजर गायडंस सुद्धा असते, ज्यामुळे ही अचूकपणे आणि लांब अंतरावर लक्ष्य गाठण्यास सक्षम आहे. या मिसाईलवर इलेक्ट्रॉनिक जॅमिंगचाही परिणाम होत नाही. हे विशेषतः बंकर नष्ट करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. राफेल लढाऊ विमान एका वेळी ६ हॅमर मिसाईलसह उड्डाण करू शकते. म्हणजेच एकावेळी 6 वेगवेगळ्या ठिकाणांना निशाणा बनवले जाऊ शकते. वर्ष 2020 मध्ये भारताने हे मिसाईल खरेदी केलं होतं. हॅमर मिसाईलचा वापर भारतीय सैन्याने जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन आणि लश्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी ठिकाणांना नेस्तनाबूत केले.Read Also,