Header

Elon Musk Latest News : एलन मस्क यांनी सोडली डोनाल्ड ट्रम्प यांची साथ, अमेरिकन प्रशासनातून वेगळा होण्याचा निर्णय

Elon Musk Latest Newsअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे मानले जाणारे अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांनी ट्रम्प प्रशासन सोडली आहे. ट्रम्प यांचे सल्लागार पद सोडण्याची घोषणा एलन मस्क यांनी केली आहे. सोशल मीडियावर मस्क यांनी ही माहिती दिली. संघीय नोकरशाहीत सुधारणा करण्याचे काम मस्क यांनी केले होते. सरकारी खर्च कमी करण्याची जबाबदारी ट्रम्प यांनी मस्क यांच्यावर दिली होती.


Elon Musk Latest News : एलन मस्क यांनी सोडली डोनाल्ड ट्रम्प यांची साथ, अमेरिकन प्रशासनातून वेगळा होण्याचा निर्णय

ट्रम्प यांचे मानले आभार

मस्क यांनी X वर पोस्ट लिहिली आहे. त्यात म्हटले की, विशेष सरकारी कर्मचारी म्हणून माझा कार्यकाळ संपत आहे. सरकारी खर्च कमी करण्याची संधी दिल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानू इच्छितो. डीओजीई मिशन कालांतराने अधिक मजबूत होईल. कारण ते सरकार चालवण्याचा एक मार्ग बनेल. डीओजीईचे कामकाज पाहत असल्यामुळे मस्क आपल्या उद्योगाकडे लक्ष देऊ शकत नव्हते.

डोनाल्ड ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी एलन मस्क यांना अमेरिकन सरकारमध्ये विशेष सरकारी कर्मचारी म्हणून नियुक्त केले होते. त्यानंतर गेली 130 दिवस सरकारमध्ये काम करत राहिले आणि आपला सल्ला देत राहिले. व्हाइट हाउसमधील अधिकाऱ्याने सांगितले की, विशेष सरकारी कर्मचारी म्हणून मस्क यांची ‘ऑफबोर्डिंग’ बुधवार रात्रीपासून सुरु झाले. मस्क यांनी ट्रम्प यांची साथ सोडण्यापूर्वी ट्रम्प यांनी आणलेले बिग ब्यूटीफुलाला विरोध केला होता. त्यात मल्टी-ट्रिलियन डॉलरसाठी टॅक्स ब्रेक आणि संरक्षण खर्च वाढवण्याचे आश्वासन दिले होते. मस्क यांनी जाहीरपणे या बिलावर नाराजी व्यक्त केली होती.

हे जरूर वाचा:- White Nights by Fyodor Dostoyevsky - Book Summary in Marathi : फ्योदोर दोस्तोयेव्स्की यांच्या 'व्हाईट नाईट्स' कादंबरीचा मराठी सारांश

टेस्ला कारच्या विक्रीत घट

एलन मस्कच्या टेस्ला कारच्या विक्रीत सतत घट होत आहे. टेस्लाच्या शेअर्समध्ये सतत घसरण होत आहे. यामुळे गुंतवणूकदार बाहेर पडत आहे. दरम्यान, टेस्ला गुंतवणूकदारांनीही मस्क यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मस्कची कंपनी टेस्ला अमेरिकेत मोठ्या प्रमाणात बहिष्काराचा सामना करत आहे. त्याचा परिणाम कंपनीच्या विक्रीवर झाला आहे.


जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.


Read Also,


Best Car Tyres for mileage : ट्यूबलेस या बिना ट्यूब वाले, कौन से टायर्स लगाने से ज्यादा माइलेज देती है कार?


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.