Header

या वीकेंडला होणार भरपूर मनोरंजन, ओटीटीवर रिलीज होणार दमदार चित्रपट अन् सीरिज, वाचा यादी - OTT Release This Week

OTT Release This Week: जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर काय पाहता येणार, हे जाणून घेण्याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. चित्रपट आणि वेब सीरिजचे चाहते या वीकेंडला काय पाहायचं, याचं प्लॅनिंग करत असतात. हा वीकेंड तुम्हाला मनोरंजनाचा डोस मिळणार आहे.


५ जानेवारी ते ११ जानेवारीपर्यंत वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट व वेब शो रिलीज होणार आहेत. यामध्ये ‘दे दे प्यार दे 2’ हा हिंदी चित्रपट, तसेच दाक्षिणात्य चित्रपट व रिअॅलिटी शोचा समावेश आहे.


या वीकेंडला होणार भरपूर मनोरंजन, ओटीटीवर रिलीज होणार दमदार चित्रपट अन् सीरिज, वाचा यादी - OTT Release This Week

OTT Release This Week


मास्टरशेफ इंडिया सीजन 9

Masterchef India Season 9 : ‘मास्टरशेफ इंडिया 9’ ५ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. तुम्ही हा शो सोनी लिव्ह व सोनी चॅनलवर सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता पाहू शकता.

शार्क टँक इंडिया सीझन 5

Shark Tank India Season 5 : शार्क टँक इंडियाचे पाचवे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. यावर्षी जुन्या शार्कबरोबरच वरुण अलघ, मोहित यादव व कनिका टेकरीवालदेखील शार्क म्हणून दिसणार आहेत. हा शो ५ जानेवारीपासून सोनी लिव्ह वर पाहू शकता.

अखंडा 2- थंडावम

Akhanda 2: Thaandavam : ‘अखंड 2: थंडावम’ हा तेलुगू अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात नंदामुरी बालकृष्ण, संयुक्ता मेनन, आधी पिनिसेट्टी व हर्षाली मल्होत्रा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट २०२१ मधील ‘अखंड’चा सीक्वेल आहे. ‘अखंड 2: थंडावम’ ९ जानेवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज होईल.

दे दे प्यार दे 2

De De Pyaar De 2 on OTT: २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘दे दे प्यार दे’ हा चित्रपट हिट झाला होता. तब्बू, अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. जवळजवळ सहा वर्षांनंतर, निर्मात्यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये चित्रपटाचा दुसरा भाग ‘दे दे प्यार दे २’ आणला. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होईल. तुम्ही हा चित्रपट ९ जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

हे जरूर वाचा:- Advice for love problems : प्यार में भावनाओ में न बहे 'दिल के साथ दिमाग का भी सही इस्तेमाल करें'.

फ्रीडम अॅट मिडनाइट सीझन 2

Freedom At Midnight Season 2 on OTT : सिद्धांत गुप्ता, चिराग वोहरा आणि राजेंद्र चावला यांची ‘फ्रीडम अॅट मिडनाईट’ सीझन २ ही १९४७ च्या भारत-पाकिस्तान फाळणीवर आधारित आहे. या सीरिजचा दुसरा सीझन ९ जानेवारी रोजी सोनी लिव्हवर प्रसारित होणार आहे.


जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.


Read Also,


आतडे होतील स्वच्छ आणि पोट होईल साफ; फक्त १५ दिवस हा चहा पिऊन बघा; शरीरातील बदल पाहून थक्क व्हाल - Tea to Clean Intestines Naturally



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.