Why Apple iPhone are Expensive: दरवर्षी सप्टेंबरमध्ये अॅपल आपले नवीन आयफोन लाँच करते. यावेळी अॅपलने आयफोन 17 लाँच करण्यासाठी 9 सप्टेंबर ही तारीख निश्चित केली आहे. कंपनीचे फ्लॅगशिप आयफोन खूप महाग आहेत. प्रत्येकाला आयफोन खरेदी करायचा असतो, परंतु बहुतेक लोकांची ही इच्छा पूर्ण होत नाही. अशा परिस्थितीत, अनेक लोकांच्या मनात एक प्रश्न येतो की अॅपलचे आयफोन इतके महाग का आहेत?
पण अॅपल फक्त आयफोन महाग देतं की, त्या किंमतीच्या तोडीचं काही मिळतं? आयफोन अँड्रॉइडपेक्षा महाग का आहेत याची कारणं जाणून घ्या.
बेस्ट परफॉर्मेंस
अॅपलने युजर्सच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे यात शंका नाही. सर्वोत्तम कामगिरी हे यामागील मुख्य कारण आहे. अॅपलचे आयफोन वर्षानुवर्षे फास्ट परफॉर्मन्स देतात. त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या ए-सिरीज चिप्स खूप पॉवरफूल आहेत, इन-हाऊस चिप असल्याने, आयफोन कठीण गोष्टीही सहजपणे हाताळू शकतात.
निष्ठा
युजर्स अॅपलशी निष्ठावान आहेत. त्यामुळेच महागडे असूनही, आयफोन मोठ्या संख्येने खरेदी केले जातात. असे बरेच लोक आहेत ज्यांना किंमत किती आहे यावरुन काही फरक पडत नाही. उलट, त्यांना कोणत्याही किंमतीत अॅपलचं नवं मॉडेल हवं असतं. युजर्सची कंपनीवरील ही निष्ठाच त्यांना नवीन बदल करण्यास प्रेरित करत असते. नवीन बदलांमुळे त्याची किंमत अँड्रॉइडपेक्षा जास्त होते.
हे जरूर वाचा:- Advice for love problems : प्यार में भावनाओ में न बहे 'दिल के साथ दिमाग का भी सही इस्तेमाल करें'.
सुरक्षा आणि गोपनीयता
आजच्या डिजिटल युगात, सुरक्षा आणि गोपनीयता या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या बाबतीत, आयफोन अँड्रॉइड स्मार्टफोनपेक्षा खूप पुढे आहेत. त्याला हॅक करणं खूप कठीण आहे, अॅपल जितक्या सुरक्षिततेचा दावा करतो ती त्यांच्या आयफोनमध्ये देखील दिसून येते. आयफोनमध्ये व्हायरस प्रवेश कऱणं फार कठीण आहे.
डिझाइन आणि मटेरियल
अँड्रॉइडच्या तुलनेत, आयफोन आकर्षक दिसतात. याचे कारण चांगल्या दर्जाचे मटेरियल आहे. त्यांना डिझाइन करताना, स्टाईलवर बरेच लक्ष केंद्रित केले जाते आणि ते बनवताना विशेष प्रकारचे मटेरियल वापरले जाते. ज्यामुळे ते खूप मजबूत असतात. त्याची बॉडी अनेक मटेरियलपासून बनलेली असते.
आधुनिक फिचर्स
नवे बदल आणि आधुनिक फिचर्सच्या बाबतीत अॅपलची इतरांशी तुलनाच करता येत नाही. अॅपलने आधीच दिलेल्या गोष्टी अँड्रॉइडमध्ये बऱ्याच काळानंतर उपलब्ध आहेत किंवा अजिबात उपलब्ध नाहीत. अॅपलच्या आयफोनमध्ये कमी मेगापिक्सेल कॅमेरा असूनही फोटोची क्वालिटी उत्कृष्ट आहे. त्यामुळे युजर्स आयफोनवर जास्त पैसे खर्च करण्यापूर्वी अजिबात विचार करत नाहीत.
जर तुम्ही आयफोन वापरत असाल तर तुम्हाला हे माहित असेल की अॅपलचं कस्टमर सपोर्ट खूप चांगलं आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणी, अॅपल आपल्या ग्राहकांच्या समस्या ऐकते आणि त्या सोडवते. इतर स्टोअरच्या तुलनेत अॅपल स्टोअरमध्ये ग्राहकांना चांगली वागणूक दिली जाते.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.
Read Also,
.jpg)