Header

Tea Making Process : चहा नेमका कसा बनवायचा? लोकं काय चुका करतात? टपरीसारखा चहा घरी करण्याचं ‘सोपं सीक्रेट’; अनेकांना माहीत नाही योग्य पद्धत.

Tea Making Processभारतीयांचं आवडतं पेय म्हणजे चहा. वरवर साधा दिसणारा हा चहासुद्धा अतिशय वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. अगदी एकाच घरातली चार माणसे चार वेगळ्या पद्धतीने चहा करतात आणि त्या त्या वेळी चव बदललेली असते. पाणी, चहा पावडर, साखर यांचं घेतलं जाणारं भिन्न प्रमाण चहाला वेगळीच चव देऊन जाते. प्रत्येक वेळी चहा परफेक्टच बनतो, असं नाही. खरं तर चहा बनवताना आपण अनेकदा काही चुका करतो, ज्यामुळे त्याची चव खराब होते. पण, चहामध्ये वापरल्या जाणाऱ्या गोष्टी तर त्याच असतात ना; मग तरीही चहाची चव वेगवेगळी कशी? मग चहा बनविण्याची योग्य पद्धत कोणती, तो कसा बनवायचा, याचा कधी विचार केला आहे का? खरं तर चहातील प्रत्येक पदार्थ एका विशिष्ट वेळेला टाकायचे असतात. आम्ही तुम्हाला चहा बनविण्याची खास पद्धत सांगणार आहोत.


Tea Making Process : चहा नेमका कसा बनवायचा? लोकं काय चुका करतात? टपरीसारखा चहा घरी करण्याचं ‘सोपं सीक्रेट’; अनेकांना माहीत नाही योग्य पद्धत.

तुम्हाला मसाला चहा आवडतो किंवा आल्याचा चहा, काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही प्रत्येक वेळी तो परिपूर्ण चहा घरी बनवू शकता. चहा करताना कोणत्या चुका करू नयेत, हे खालीलप्रमाणे सांगण्यात आले आहे.

चहा बनवताना ‘या’ चुका टाळा

  • सर्वप्रथम चहा बनविण्यासाठी कधीही कच्चे दूध वापरू नये. चहा बनविण्यासाठी फक्त उकळलेले दूध वापरण्याचा प्रयत्न करा. फ्रिजमध्ये ठेवलेले दूध खोलीच्या तापमानाला येण्यासाठी ते बाहेर काढा. दोन कप चहा बनवायचा असेल, तर एक कप दूध काढून बाजूला ठेवा. जेव्हा तुम्ही उकळत्या चहामध्ये थंड दूध घालता तेव्हा चहाचे तापमान अचानक बदलते आणि त्यामुळे त्याची चव बिघडते.
  • चहामध्ये जोडल्या जाणाऱ्या मसाल्यांबद्दल सांगायचे तर, लोकांना अनेकदा आल्याचा चहा आवडतो. त्यासाठी नेहमी चहामध्ये ठेचलेले आले घालावे हे लक्षात ठेवा. अनेक वेळा लोक चहामध्ये किसलेले आले घालतात. त्यामुळे चहाही कडू होतो.

  • अनेकदा घरी चहा बनविताना वेळ वाचविण्यासाठी लोक पाणी व दूध एकत्र करतात आणि चहा उकळल्यावर आले घालतात. पण, या प्रक्रियेत मसाले आणि चहा पावडर व्यवस्थित मिसळायला वेळ मिळत नाही.
  • चहा बनविताना आधी पाणी उकळून घ्या. पाणी उकळायला लागल्यावर प्रथम ठेचलेले आले आणि इतर मसाले घाला. त्यांना या पाण्यात किमान एक मिनीट उकळू द्या, जेणेकरून मसाल्यांची चव त्या पाण्यात उतरेल. त्यानंतर त्या उकळत्या पाण्यात चहा पावडर टाका.
  • चहाच्या पावडरबरोबरच पुढच्या १० सेकंदांत साखरही घाला. जर तुम्ही दुधात साखर घातली, तर त्यामुळे दूध पातळ होते.
  • चहा बनविताना तुमच्या लक्षात येईल की, अनेकदा चहा पावडर उकळताना भांड्याला चिकटून राहते. अशा परिस्थितीत, चमच्याच्या साह्याने आजूबाजूची चहा पावडर भांड्यात परत टाकणे महत्त्वाचे आहे.
  • दूध घातल्यानंतर चहाला किमान दोन मिनिटे उकळू द्या आणि हे मध्यम आचेवर करा.

हे जरूर पहा:-   Coloring Pages for Kids PDF : बच्चों के लिए आकर्षक रंग भरने के Coloring Pages Free डाउनलोड PDF

असा बनवा तुमचा चहा… (परफेक्ट चहा रेसिपी)

  • दोन कप चहा बनवायचा असेल, तर एक कप उकळलेले दूध काढून बाजूला ठेवा.
  • त्यानंतर दोन कप चहासाठी भांड्यात दोन कप पाणी घाला आणि ते उकळण्यासाठी मंद आचेवर ठेवा.
  • पाणी उकळल्यावर त्या उकळत्या पाण्यात ठेचलेले आले टाका. (तुम्ही मसाला चहा बनवत असाल, तर तुम्ही वेलची, लवंगा किंवा इतर मसालेदेखील घालू शकता.)
  • हे पाणी किमान दोन मिनिटे उकळवा. या उकळत्या पाण्यात चहा पावडर घाला आणि पुन्हा दोन मिनिटे उकळा. त्यानंतर चहामध्ये साखर घाला.
  • त्यानंतर त्यात फ्रिजमधून थोडा वेळ बाहेर काढून ठेवलेले दूध ओता. (एकदम फ्रिजमधून काढलेले दूध घालू नका) मधोमध एका चमचाच्या मदतीने चहा ढवळत राहा.
  • चहा दोन मिनिटे दुधात उकळल्यानंतर तो गाळून घ्या.
आता तुमचा परिपूर्ण चहा तयार आहे.

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.

Read Also,

Ac Installation Tips : एसी घेताय? इंस्टॉलेशनच्या वेळेस ‘या’ ५ गोष्टी विसरू नका!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.