TVS CNG Jupiter : वाढलेले पेट्रोलचे दर आणि प्रदुषणामुळे ईव्ही गाड्यांनी मार्केटमध्ये आपला चांगलाच जम बसवला आहे. पण ईव्ही गाड्यांबद्दल हवी तितकी विक्री अजूनही वाढलेली नाही. अशातच TVS म मोटर्सने सुवर्णमध्य काढल आपली पहिली वहिली CNG Jupiter लवकरच मार्केटमध्ये आणणार आहे. अलीकडे tvs ने ऑटो एक्सपो २०२५ मध्ये CNG Jupiterची झलक दाखवली होती. पण कंपनीने अजूनही लाँच कधी करणार याबद्दल खुलासा केलेला नाही. पण CNG Jupiterची मार्केटमध्ये आतुरतेनं वाट पाहिली जात आहे.
TVS CNG Jupiter
आतापर्यंत भारतात बजाज ऑटोनं आपली पहिली सीएनजी बाइक फ्रिडम १२५ लाँच केली. ही बाइक जगातली पहिली सीएनजी बाइक ठरली आहे. आता त्यानंतर टीव्हीएस आपली पहिली CNG स्कूटर तयार केली आहे. TVS ची CNG Jupiter ही जगातली पहिली सीएनजी स्कुटर ठरली आहे. मुळात स्कुटर ही मध्यमवर्गीय आणि तरुणांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. त्यामुळे मायलेजच्या दृष्टीने TVS CNG Jupiter ही गेंमचेंजर ठरणार आहे.
पण Jupiter मध्ये महत्त्वाची जागा मिळणार नाही. सीट खाली हेल्मेट असेल किंवा तुमचं साहित्य असेल ते ठेवण्यासाठी भरपूर अशी जागा होती. पण आता या नवीन TVS CNG Jupiter मध्ये ही जागा मिळणार नाही. या ठिकाणी TVS ने में CNG टँक फिट केला आहे. त्यामुळे सीटखाली असलेली हक्काची जागा निघून गेली आहे.
हे जरूर वाचा:- Baby Boy Names in Marathi Starting with M : आपल्या बाळाच्या भविष्यासाठी अर्थपूर्ण व अद्वितीय नाव निवडा
पण सीटखाली जागा जरी मिळणार नसेल पण पायाजवळ नेहमीसारखीच जागा असणार आहे. त्यामुळे तुम्हाला काही साहित्य असेल ते तुम्हाला सहज तिथे ठेवता येणार आहे. आता Jupiterच्या सीएनजी मॉडेलमुळे सगळ्यांना मोठा फायदा मिळणार आहे. सीएनजीवर या स्कुटरचं मायलेज तब्बल 226 किमी मिळेल असा दावा कंपनीने केला आहे.
२२६ किमी मायलेज जर स्कुटरने दिलं तर पेट्रोलचा बराच मोठा खर्च वाचणार आहे. या सीएनजी स्कुटर मध्ये 1.4 किलोग्राम इतकी टाकी देण्यात आली आहे. या टाकीसोबत 2-लिटर पेट्रोलची टाकीही देण्यात आली आहे.
हे जरूर वाचा:- Dinacharya - Ritucharya PDF : उत्तम आरोग्यासाठी महत्वाची दिनचर्या आणि ऋतुचर्या PDF मध्ये
नव्या Jupiter CNG 124.8cc इंजिन दिलं आहे जे 7.1 bhp आणि 9.4 Nm इतका टॉर्क जेनेरेट करतो. अंडर-सीट स्टोरेज व्यतिरिक्त CNG Jupiter ही सेम पेट्रोल Jupiter सारखीच दिसायला आहे.
नवीन TVS ने आपल्या या नवीन Jupiter CNG कधी लाँच करणार याबद्दल अद्याप अधिकृत माहिती दिली नाही. पण असं सांगितलं जात आहे की 2025 मध्ये जून महिन्यात लाँच करण्याची शक्यता आहे.