Vitamin Deficiency Causes Anxiety: आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी विशिष्ट जीवनसत्वे महत्वाची भूमिका बजावत असतात. इतकेच नव्हे तर हे जीवनसत्त्वे तुमच्या विचार करण्याच्या आणि समजण्याच्या क्षमतेमध्ये देखील मोठी भूमिका बजावत असतात. तर आज आम्ही तुम्हाला अशा एका जीवनसत्वाची माहिती सांगणार आहोत, ज्याच्या कमतरतेमुळे व्यक्तीला सतत कसली तरी चिंता सतावत राहते.
कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे चिंता वाढते?
आजच्या धकाधकीच्या जीवनात कोणालाच चिंता सुटलेली नाही. पण या चिंतेची पातळी त्रासदायक ठरू नये, आणि याचा तुमच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल, व्हिटॅमिन डी3 चा आहारात आवर्जून समावेश करा. (Which Vitamin Deficiency Causes Anxiety)
तर आज आम्ही तुम्हाला व्हिटॅमिन डी3 च्या कमतरतेमुळे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो याबद्दल माहिती सांगणार आहोत.
व्हिटॅमिन-डी3 च्या कमतरतेमुळे काय होते?
व्हिटॅमिन डी3 ची कमतरता जर असेल तर ती व्यक्ति सतत कोणत्या ना कोणत्या चिंतेत ग्रस्त झालेली दिसू शकते. व्हिटॅमिन डी 3 हे मानसिक आरोग्याची काळजी घेते, त्यामुळे त्याची कमतरता झाल्यास व्यक्तीमध्ये भावनिक आणि मानसिक संतुलनाचा अभाव जाणवू शकतो.
व्हिटॅमिन डी 3 चे कार्य काय आहे? व्हिटॅमिन डी 3 मेंदूमध्ये न्यूरो-स्टिरॉइड रसायन म्हणून काम करते आणि चिंता, नैराश्यासारख्या परिस्थितींवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते.
व्हिटॅमिन डी 3 च्या कमतरतेमुळे काय होते? जेव्हा शरीरात व्हिटॅमिन डी 3 ची कमतरता असते तेव्हा स्किझोफ्रेनिया, नैराश्य आणि हंगामी भावनिक विकार होण्याचा धोका वाढतो. यामुळे लोकांमध्ये चिंता आणि अस्वस्थता वाढत जाते.
हे जरूर वाचा:- D Gukesh : The Youngest world Chess Champion Gukesh की सफलता का रहस्य.व्हिटॅमिन डी 3 ची कमतरता भरून काढण्यासाठी आहार
जी व्यक्ति सतत चिंता किंवा तणावाखाली आहे, आणि त्याला त्यापासून आराम मिळवायचा असेल, तर आहारात व्हिटॅमिन डी 3 शी संबंधित पदार्थांचा आवर्जून समावेश करायला हवा. जे खालीलप्रमाणे आहेत.
सूर्यप्रकाशव्हिटॅमिन डी 3 ची मुख्य स्रोत सूर्यप्रकाश आहे. दररोज 15-30 मिनिटे सूर्यप्रकाशात बाहेर जाऊन वावरल्याने शरीर व्हिटॅमिन डी 3 तयार करू शकते.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दूध, दही आणि चीजमध्येही व्हिटॅमिन डी 3 असते, त्यामुळे या पदार्थांचे सेवन देखील आवश्यक आहे.
सूर्यफुलांच्या बिया या बियाण्यांमध्येही व्हिटॅमिन डी 3 असते आणि याचा आहारात समावेश करणे उपयुक्त ठरू शकते.
पनीर पनीर किंवा कॅसिइनयुक्त उत्पादनांमध्ये देखील व्हिटॅमिन डी 3 असतो.
हे जरूर वाचा:- Picnic Spot in Maharashtra : बापरे इतने गजब के Picnic Spot
तुम्ही नियमितपणे या पदार्थांचा आहारात समावेश करून व्हिटॅमिन डी 3 ची कमतरता भरून काढू शकता. जर कमी व्हिटॅमिन डी 3 चे परिणाम गंभीर असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार घेणे महत्त्वाचे आहे.
Disclaimer: हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. तो एक व्यावसायिक सल्याचा पर्याय, निदान किंवा उपचार नाही. तुम्हाला कोणताही आजार असल्यास, कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच कोणताही निर्णय घ्या.