Header

Low Glycemic Index Foods - मधुमेहींसाठी गव्हाची पोळी ठरत आहे का सायलेंट किलर? जाणून घ्या लो-कार्ब पोळ्यांचे फायदे

Low Glycemic Index Foods: मधुमेह (डायबिटीज) हा आजार केवळ रक्तातील साखरेची पातळी वाढण्यापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण जीवनशैलीवर परिणाम करणारा विकार आहे. औषधोपचारांइतकेच आहारातील शिस्त आणि योग्य अन्ननिवड याला महत्त्व असते. भारतीय आहारात पोळीआणि भात हे मुख्य घटक असल्याने मधुमेही रुग्णांसाठी सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो तो कार्बोहायड्रेटच्या प्रमाणाचा. विशेषतः रोजच्या गव्हाच्या पोळ्या, ज्या पोट भरण्यासाठी सोयीस्कर वाटतात, त्या दीर्घकालीन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात, असे वैद्यकीय अभ्यास सूचित करतात.


Low Glycemic Index Foods - मधुमेहींसाठी गव्हाची पोळी ठरत आहे का सायलेंट किलर? जाणून घ्या लो-कार्ब पोळ्यांचे फायदे

Low Glycemic Index Foods

कार्बोहायड्रेटचे शरीरातील रूपांतर (Carbohydrate Metabolism)

आपण खात असलेले कार्बोहायड्रेट पचन प्रक्रियेदरम्यान ग्लुकोजमध्ये रूपांतरित होते. हे ग्लुकोज रक्तात मिसळल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढते. निरोगी व्यक्तींमध्ये इन्सुलिन ही साखर नियंत्रित करते, मात्र मधुमेहींमध्ये इन्सुलिनची निर्मिती किंवा कार्यक्षमता कमी झालेली असते. परिणामी अतिरिक्त ग्लुकोज शरीरासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे कोणत्या प्रकारचे कार्बोहायड्रेट किती प्रमाणात घ्यायचे, याचा विचार करणे आवश्यक ठरते.

गव्हाची पोळी आणि रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढणे (Wheat Roti and Sugar Spike)

डायबिटीज तज्ज्ञांच्या मते गव्हाच्या पिठात सुमारे साठ टक्के कार्बोहायड्रेट स्टार्च स्वरूपात असते. १०० ग्रॅम गव्हाच्या पिठापासून बनवलेली पोळी शरीरात जवळपास ६० ग्रॅम ग्लुकोज तयार करते. गव्हाचा ग्लायसेमिक इंडेक्स(रक्तातील साखरेवर होणारा परिणाम) तुलनेने जास्त असल्यामुळे पोळी खाल्ल्यानंतर रक्तातील साखर झपाट्याने वाढते. रोजच्या आहारात सातत्याने आठ ते दहा पोळ्या घेतल्यास इन्सुलिन रेजिस्टन्स वाढण्याचा धोका निर्माण होतो, ज्यामुळे रुग्ण आयुष्यभर औषधांवर अवलंबून राहू शकतो.

सामान्य परिस्थितीत इन्सुलिन रक्तातील साखर पेशींमध्ये प्रवेश करून ऊर्जा म्हणून वापरण्यास मदत करते. मात्र इन्सुलिन रेजिस्टन्समध्ये पेशी इन्सुलिनकडे “दुर्लक्ष” करतात. त्यामुळे रक्तातील साखर पेशींमध्ये न जाता रक्तातच साचू लागते.

हे जरूर वाचा:- Motivational Story in Hindi - जीवन की सबसे बड़ी सिख देने वाली मोटिवेशनल स्टोरी    

लो-ग्लायसेमिक आहाराचे महत्त्व (Importance of Low Glycemic Diet)

ग्लायसेमिक इंडेक्स (रक्तातील साखरेवर होणारा परिणाम) कमी असलेले धान्य हळूहळू पचते आणि ग्लुकोज रक्तात संथ गतीने सोडते. फायबरयुक्त अन्न पचन प्रक्रियेला मंदावते, त्यामुळे अचानक रक्तातील साखरेच्या पातळीत अचानक वाढ टाळता येते. याच कारणामुळे मधुमेहींसाठी गव्हाच्या ऐवजी कमी कार्बयुक्त आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या धान्यांचा विचार करणे आरोग्यदायी ठरते.

बाजरी आणि इन्सुलिन संवेदनशीलता (Pearl Millet and Insulin Sensitivity)

बाजरा हा फायबर, प्रोटीन आणि मॅग्नेशियमचा चांगला स्रोत मानला जातो. मॅग्नेशियम शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवते, असे अनेक संशोधनातून स्पष्ट झाले आहे. बाजऱ्यातील फायबर पचनसंस्थेत जेलसारखी संरचना तयार करते, ज्यामुळे ‘कार्बोहायड्रेट’चे विघटन हळूहळू होते आणि जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

इन्सुलिनची संवेदनशीलता म्हणजे शरीरातील पेशी इन्सुलिन या हार्मोनला किती प्रभावीपणे प्रतिसाद देतात याची क्षमता. जेव्हा इन्सुलिनची संवेदनशीलता चांगली असते, तेव्हा कमी प्रमाणातील इन्सुलिनही रक्तातील साखर पेशींमध्ये पोहोचवून ऊर्जा म्हणून वापरण्यास मदत करते. परिणामी रक्तातील साखर नियंत्रणात राहते

हे जरूर वाचा:- bhuna chana khane ke fayde - खाने में मजा, सेहत में धमाका! भूना चना के ये फायदे सुनकर उड़ जाएंगे आपके होश!

ज्वारी आणि स्टार्चचे शोषण (Sorghum and Starch Absorption)

ज्वारी हे ‘ग्लूटेन’ (एक नैसर्गिक प्रोटीन) मुक्त धान्य असून पचनासाठी हलके मानले जाते. आंतरराष्ट्रीय संशोधनानुसार ज्वारीतील टॅनिन्स शरीरात स्टार्चचे शोषण कमी करतात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. टाइप-२ डायबिटीज असलेल्या रुग्णांसाठी ज्वारी हा सुरक्षित पर्याय ठरू शकतो.

चण्याचे पीठ आणि दीर्घकाळ तृप्ती (Chickpea Flour and Satiety)

चण्याच्या पिठात प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते हळूहळू पचते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही आणि पोट भरल्याची भावना दीर्घकाळ टिकते. चण्याचा ग्लायसेमिक भार कमी असल्याने वारंवार भूक लागण्याची समस्या कमी होते, जी मधुमेहींमध्ये सामान्यतः आढळते.

नाचणी आणि ‘एन्झाइम’वर परिणाम (Finger Millet and Enzyme Regulation)

नाचणी हा ‘लो-ग्लायसेमिक’ धान्यप्रकार असून त्यामध्ये कॅल्शियम आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. संशोधनानुसार रागीचे सेवन केल्याने ‘अल्फा-ग्लुकोसिडेस’ या एन्झाइमची क्रिया कमी होते. हे एन्झाइम कार्बोहायड्रेटचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते. त्यामुळे नाचणीची पोळीरक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

सोया पीठ आणि वजन-शुगर नियंत्रण (Soy Flour and Sugar Control)

सोया पिठात प्रोटीनचे प्रमाण जास्त आणि कार्बोहायड्रेट कमी असते. वैद्यकीय अभ्यास दर्शवतात की सोया प्रोटीन इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करण्यात उपयुक्त ठरते. त्यामुळे यकृतातील ग्लुकोज निर्मिती कमी होते आणि उपाशी पोटी रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास मदत मिळते.

मधुमेह रुग्णांनी पोळीपूर्णपणे टाळणे आवश्यक नसून योग्य धान्याची निवड आणि प्रमाणावर नियंत्रण ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. लो-ग्लायसेमिक आणि फायबर-प्रोटीनयुक्त धान्यांचा समावेश केल्यास रक्तातील साखर अधिक स्थिर ठेवता येते. मात्र कोणताही आहारातील बदल करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.


Read Also,


Why Homeless People Have Long Hair? - ना महागडे शॅम्पू-कंडिशनर, ना हेअर स्पा, तरीही भिकाऱ्यांचे केस इतके लांब कसे असतात? फक्त एकच…


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.