भारताच्या ऑटो सेक्टरमध्ये जगाला अचंबित करणारी घडामोड घडली आहे. टाटा सिएराचे बुकिंग सुरु होताच 24 तासात 70,000 SUV कारची बुकिंग झाली आहे. हा एक नवा विक्रम मानला जात आहे.
सिएराने प्रीमियम मिड-एसयूव्हीची एक नवीन श्रेणी तयार केली आहे. जागा, आराम, लक्झरी, सुरक्षितता आणि दैनंदिन वापराची सोय वाढवून, सिएराने या विभागात एक नवीन बेंचमार्क स्थापित केला आहे."
टाटा मोटर्सची नवीन सिएरा एसयूव्ही तीन प्रगत इंजिन पर्यायांसह येते. 1.5 -लिटर क्रायोजेट डिझेल इंजिन, जे उच्च इंधन कार्यक्षमता आणि मजबूत कामगिरी शोधणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे. 1.5 -लिटर टर्बो जीडीआय हायपेरियन पेट्रोल इंजिन अधिक शक्ती आणि सुरळीत ड्रायव्हिंग अनुभव देते. 1.5-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन दैनंदिन वापरासाठी एक विश्वासार्ह आणि आरामदायी पर्याय आहे. ही इंजिने ड्रायव्हिंगच्या विविध गरजा पूर्ण करतात आणि मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही पर्यायांसह उपलब्ध आहेत.
सर्व-एलईडी लाईट्स, एक आकर्षक आणि आधुनिक बाह्य डिझाइन, प्रीमियम इंटीरियर, 3-स्क्रीन, एक पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, 360 डिग्री कॅमेरा, लेव्हल 2 एडास आणि तब्बल 622 लिटर बूट स्पेस, इतर विशेष वैशिष्ट्यांसह आहे.
हे जरूर वाचा:- Amaranth Grain - अंडे से भी ज्यादा ताकतवर है ये लड्डू, 1 महीने में दुबला-पतला शरीर बनेगा मजबूत पहलवान, देखकर लोग रह जाएंगे हैरान।
नवीन टाटा सिएराची एक्स-शोरूम किंमत 11.49 लाख रुपयांपासून सुरू होते. टॉप मॉडेलची किंमत 21.29 लाख रुपयांपर्यंत आहे.
टाटा मोटर्सने नवीन पिढीच्या सिएराला आधुनिक काळानुसार पूर्णपणे नवीन लूक आणि डिझाइन पुन्हा लाँच केले. यात अनेक नवीन फिचर्स ग्राहकांना मिळत आहेत. 'एस्केप मेडिओक्रे' मध्ये ही नव्याने लाँच करण्यात आली.
1991 मध्ये देशातील पहिली एसयूव्ही म्हणून लाँच झालेल्या टाटा सिएराने 2003 पर्यंत भारतीय बाजारपेठेत वर्चस्व गाजवले. ही कार तीन दशकांहून अधिक काळ या कारने मार्केटमध्ये आपला दबदबा कायम ठेवला.
टाटा सिएरा एसयूव्हीने भारतीय ऑटोमोबाईल बाजारात जोरदार पुनरागमन केले आहे. टाटा सिएराची किंमत 25 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आली.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.
Read Also,
.jpg)