Budget EV: मिडिल क्लास लोकांसाठी परफेक्ट EV! 250KM रेंज, 5 मिनिटांत फुल चार्ज; किंमत फक्त 4.50 लाख रुपये

Budget EV: Blinq RYDE या कारची भारतीय मार्केटमध्ये एंट्री झाली आहे. मिडिल क्लास लोकांसाठी ही बेस्ट ऑप्शन ठरते. ही कार भारतीय बाजारात खुप आक्रमक आणि परवडणाऱ्या किंमतीसह उतरवण्यात आली आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 4.50 लाख रुपयांपासून सुरू होऊन 5 लाख रुपयांपर्यंत जाते. कंपनीने ही कार दोन मुख्य व्हेरिएंट्स RYDE Family आणि RYDE Fleets मध्ये सादर केली आहे. कौटुंबिक वापरासह ही कमर्शियल फ्लीट ऑपरेटर्ससाठी तयार केली आहे. ज्यामुळे कमी बजेटमध्ये खासगी कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना याचा थेट फायदा होणार आहे.


Budget EV: मिडिल क्लास लोकांसाठी परफेक्ट EV! 250KM रेंज, 5 मिनिटांत फुल चार्ज; किंमत फक्त 4.50 लाख रुपये

Best electric car for middle class family

या मायक्रो ईव्हीची डिझाइन मॉडर्न, फ्यूचरिस्टिक आणि पूर्णपणे एरोडायनामिक प्रोफाइलवर तयार केली आहे. शहरातील अरुंद गल्ल्या आणि मोठ्या ट्रॅफिकमध्ये ती सहज काढण्यासाठी तिचा टर्निंग रेडियस खुप लहान ठेवला आहे. फ्रंटमध्ये आकर्षक एलईडी डीआरएल, क्लोज्ड-ऑफ ग्रिल आणि हनीकॉम्ब स्टायलिंग दिली आहे. ही कार 10 वेगगवेगल्या रंग जसं की, सोबर ग्रीन, रोसो, मोचा डस्ट, मॅटेलिक येलो आणि लूनर सिल्व्हरमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.

कॉम्पॅक्ट साइज असुनही Blinq RYDE च्या केबिनला खुप समजदारीने डिझाइन केलंय. यात 5 प्रवाशांना बसण्यासाठी पुरेसी व्यवस्था आहे. जी या सेगमेंटच्या इतर मायक्रो कारच्या तुलनेत मोठी गोष्ट आहे. याचं लेआउट मिनिमलिस्टिक आहे आणि मोठ्या ग्लास एरियामुळे आतुन व्हेटिंलेटेड वाटते. सीट एर्गोनॉमिक आहेत. ज्यामुळे ड्रायव्हर आणि पॅसेंजर दोन्हींना रोजचा प्रवास करताना चांगलं लेगरूम आणि हेडरूम मिळतं.

हे जरूर वाचा:- The Concept of Maya: माया का पर्दा और नाम जाप में रुकावट

डेली ड्रायव्हिंगला सोपं आणि मजेदार बनवण्यासाठी यात अनेक स्मार्ट फीचर्स जोडले आहेत. डॅशबोर्डवर टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम दिली आहे. जी ब्लूटूथ, नेव्हिगेशन आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करते. यासह डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, पॉवर विंडो, की-लेस एंट्री, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि रीजेनरेटिव्ह ब्रेकिंगसारखे कामाचे फीचर्स दिले आहेत. ही सिस्टम ड्रायव्हिंग दरम्यान एनर्जी वाचवण्यात मदत करते.

सेफ्टीच्या बाबतीत Blinq RYDE ला भारतीय रस्ते आणि मोठा वापर लक्षात ठेवून मजबूत चेसिसवर तयार करण्यात आलंय. यात फ्रंट डिस्क ब्रेक, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रीब्यूशन(EBD) ची सुविधा मिळते. यासह रियर पार्किंग सेन्सर, सीटबेल्ट रिमाइंडर, हाय-स्पीड अलर्ट आणि रिव्हर्स पार्किंगसारखे गरजेचे सेफ्टी इक्विपमेंट सामिल केले आहेत. जे रोजच्या अर्बन ट्रिपला सुरक्षित बनवतात.

हे जरूर वाचा:- Top Tips for Buying a New Car - Avoid These Common Mistakes - नवीन कार घरी आणण्यापूर्वी कोणत्या गोष्टी तपासणे आवश्यक आहे? PDI टेस्ट म्हणजे काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

या कारची सर्वात मोठी खासियत म्हणजे तिची मॉडर्न बॅटरी आणि 'बॅटरी स्वॅपिंग' टेक्नॉलॉजी आहे. Blinq Mobility ही कंपनी 'बॅटरी-ॲज-अ-सर्व्हिस' या मॉडेलवर काम करते. ज्यामुळे कारची बॅटरी पाच मिनिटांपेक्षा कमी वेळेत बदलणं शक्य होतं. यासह, ही कार 'डीसी फास्ट चार्जिंग'आणि सामान्य 'होम चार्जिंग' या दोन्ही सुविधांना सपोर्ट करते. या कारचा बॅटरी पॅक पूर्णपणे सुरक्षित आहे. पाणी आणि धूळ यांच्यापासून संरक्षणासाठी त्याला 'IP67' रेटिंग मिळाली आहे.

Blinq RYDE मध्ये एक एनर्जी-एफिशिएंट आणि कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक मोटर लावली आहे. जी स्मूथ ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते. ही मोटर शहरातील ट्रॅफिकमध्ये क्विक पिकअप आणि लीनियर एक्सेलेशन देते. इलेक्ट्रिक पॉवरट्रेनमुळे ती चालताना खुप शांत आणि पेट्रोल-डिझेल कारच्या तुलनेत याची रनिंग कॉस्टमध्ये 60 पर्यंत कमतरता येते. ज्यामुले मेंटेनेंसचा खर्च खुप कमी येतो.

रेंजविषयी बोलायचं झाल्यास, कंपनीनुसार Blinq RYDE एकदा फूल चार्ज झाल्यावर 250 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेज देते. एवढ्या मोठ्या रेंजमुळे ती रोज ऑफिसला जाणे, शहरात राइड-हेलिंग सर्व्हिस आणि डिलिव्हरीसारख्या कामांसाठी खुप व्यावहारिक बनते. क्विक बॅटरी स्वॅपिंग सुविधा असल्याने यूझर्सला रस्त्यात चार्जिंगसाठी मोठी वाट किंवा रेंज संपण्याची चिंता राहत नाही.


जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.


Read Also,


Healthy Rotis For Weight Loss: गेहूं छोड़ें! डॉक्टर से जानें 7 सेहतमंद रोटियों के फायदे; मिलेगा भरपूर प्रोटीन





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.