7 Seater Car: Ertiga आणि इनोव्हाचे वाढले टेन्शन, या सात आसनी कारचा हंगामा, फिचर्स आणि मायलेजची कमाल

7 Seater Car: भारतीय बाजारात ७ आसनी कारची मागणी सातत्याने वाढत आहे. त्याच दरम्यान आता Kia Carens या सात आसनी कारने नवा रेकॉर्ड बनवला आहे. फॅमिली ग्राहकांना पसंद पडलेल्या या MPV ने 3 लाखाहून अधिक मॉडेल विकले आहेत. या Carens कारची लोकप्रियता केवळ शहरापर्यंत मर्यादित नाही तर छोट्या शहरात आणि ग्रामीण खेडेगावातही तिला मागणी आहे. शानदार डिझाईन, प्रीमियम केबिन, एडव्हान्स फिचर्स आणि अनेक इंजिनांचे पर्याय त्यामुळे ही कार ग्राहकांना सातत्याने आकर्षित करत आहे.


7 Seater Car: Ertiga आणि इनोव्हाचे वाढले टेन्शन, या सात आसनी कारचा हंगामा, फिचर्स आणि मायलेजची कमाल

7 Seater Car

Kia कार कंपनीने अलिकडे Carens Clavis आणि Carens Clavis EV सारखी नवीन मॉडेल्स सादर केली आहेत.ज्यामुळे या ब्रँडला आणखी मजबूती मिळाली आहे. हेच कारण आहे की आता Maruti Ertiga आणि Toyota Innova सारख्या जुन्या कार समोर आता आव्हान तयार झाले आहे. विक्रीचे आकडे पाहिले तरी ग्राहकांना आता Kia Carens MPV वर सातत्याने विश्वास वाढत आहे.

3 लाख विक्रीचा आकडा पार, मागणीत वाढ

फेब्रुवारी २०२२ मध्ये लाँच झालेल्या Kia Carens ने मे २०२६ पर्यंत घरगुती बाजारात ३,०१,६५७ युनिटची विक्री केली आहे. याशिवाय ३२ हजाराहून जास्त युनिट्स परदेशात विकले आहेत. Kia च्या पोर्टफोलिओत ही कंपनीची तिसरी सर्वाधिक विकली जाणारी कार बनली आहे. गेल्या काही वर्षात या कारच्या विक्रीचा वेग वाढत आहे.सुरुवातीला एक लाख युनिट विक्री होण्यास १६ महिन्यांहून जास्त वेळ लागत होता. मात्र, पुढील एक लाख युनिट्स आधीपेक्षा कमी वेळात विक्री झाले.

Carens, Clavis आणि Clavis EV कारच्या संयुक्त मागणीने या कारच्या विक्रीला गती दिली आहे. सणाच्या सिझनमध्येही या MPV ला शानदार रिस्पॉन्स मिळाला. वाढत्या विक्रीने स्पष्ट होते की मोठ्या फॅमिलीसाठी आरामदायक आणि फिचर लोडेड कार शोधणाऱ्यांनी पहिली पसंदीच्या रुपात Carens वेगाने पुढे येत आहे.

हे जरूर वाचा:- Baby Development Guide: नवजात बाळासाठी Musical Keyboard Mat आणि Baby Gym का आवश्यक आहे?

Clavis आणि EV मॉडेलचा शानदार गेम, फिचर्सही दमदार

Kia ने मे २०२५ मध्ये Carens Clavis आणि यानंतर काही दिवसांनी Clavis EV लाँच केले होते. या दोन्ही मॉडेल्सने Carens ब्रँडला नवी ओळख दिली आहे. Clavis मध्ये अपडेटेड स्टायलिंग, जास्त व्हेरिएंट, ६ आणि ७ आसनांचा पर्याय, पेट्रोल आणि डिझेल इंजिनचा पर्याय सारखे बदल पाहायला मिळत आहे. तसेच Clavis EV कंपनीची पहिली मेड इन इंडिया इलेक्ट्रीक MPV आहे. जिला एकदा चार्ज केल्यानंतर ती ४०४ किमी ते ४९० किमीपर्यंत रेंज देते असा दावा कंपनीने केलेला आहे.

यात पॅनॉरमिक सनरुफ, ADAS, व्हेंटिलेटेड सीट, डिजिटल फिचर्स आणि एडव्हान्स सेफ्टी टेक्नोलॉजी सारखे अनेक प्रीमियम फिचर्स मिळतात. हेच कारण आहे की फॅमिली खरेदीदारांसह EV ग्राहकांचे देखील लक्ष या कारकडे वाढत आहे. बाजारात वाढत्या लोकप्रियत दरम्यान Kia Carens आता एर्टिगा आणि इनोव्हाला एक मोठे आव्हान बनताना दिसत आहे.


जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.


Read Also,


Maruti Wagon R Flex Fuel Price: मारुती सुझुकी Wagon R flex fuel ची किंमत जाहीर, 100 टक्के इथेनॉलवर चालणार ही कार


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.