Benefits Of Banana: पौष्टिक, आरोग्यदायी, स्वादिष्ट आणि सहज उपलब्ध असणारे कोणते फळ असेल, तर ते केळे आहे. केळे सुपरफूड म्हणून ओळखले जाते. कारण- त्यात जीवनसत्वे, फायबरचे प्रमाण जास्त असते. केळे खाल्ल्यावर तुम्हाला पोट भरल्याची भावना होते, जी तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. केळे हे पोषक तत्त्वांनी समृद्ध फळ आहे, जे अनेक लोकांना सकाळी रिकाम्या पोटी खायला आवडते; पण ही सवय आरोग्यासाठी चांगली आहे का? काहींच्या मते, रिकाम्या पोटी केळे खाण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. सकाळी रिकाम्या पोटी केळे खाणे काहींसाठी फायदेशीर ठरू शकते; तर काहींसाठी ते हानिकारकही ठरू शकते. योग्य प्रकारे सेवन केल्यास, ते ऊर्जा, पचनक्रिया आणि हाडांसाठी फायदेशीर ठरू शकते. जर तुम्हाला रक्तातील साखर, आम्लपित्त किंवा गॅसचा त्रास असेल, तर तुम्ही रिकाम्या पोटी केळे खाणे टाळावे. चला जाणून घेऊया की, सकाळी केळे खाण्याचे शरीरावर काय परिणाम होतात.
Benefits Of Banana
केळी खाण्याचे फायदे
केळ्यामध्ये असे काही नैसर्गिक घटक असतात, जे पोटाच्या संरक्षणात्मक आवरणाला मजबूत करतात. हे आवरण पोटातील आम्ल आणि हानिकारक जीवाणूंविरुद्धची भिंत म्हणून काम करते. Helicobacter pylori (H. pylori) नावाचा जीवाणू पोटात अल्सर निर्माण करतो आणि दीर्घकाळात कर्करोगाचा धोका वाढवतो. नियमितपणे केळी खाल्ल्याने या जीवाणूंची क्रिया कमी होते आणि त्यामुळे पोटावर एक नैसर्गिक संरक्षणात्मक थर तयार होतो.
केळी केवळ पोटाचे रक्षणच करीत नाही, तर पचनसंस्थादेखील मजबूत ठेवते. त्यातील प्री-बायोटिक फायबर आतड्यांमध्ये चांगल्या जीवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन देतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते. केळ्यातील नैसर्गिक साखर शरीराला सातत्याने ऊर्जा पुरवते; पण रक्तातील साखरेत अचानक वाढ वा घट होऊ देत नाही.
ऊर्जावर्धक : केळ्यांमध्ये कर्बोदके आणि नैसर्गिक शर्करा असतात, ज्यामुळे त्वरित ऊर्जा मिळते.
हाडे मजबूत करते : केळ्यांमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते, जे हाडे आणि स्नायू मजबूत करतात.
रक्तदाब नियंत्रित करते : त्यातील पोटॅशियममुळे केळी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
हे जरूर वाचा:- स्वतःचे Dream Home घेताय? घर खरेदी करताना या 10 Smart Tips नक्की Follow करा! (Complete Guide)
रिकाम्या पोटी केळी खाण्याचे तोटे
केळी तुमच्या आहारात फायबर जोडण्याचा एक उत्तम मार्ग असला तरीही जास्त खाल्ल्याने पोट खराब होणे, मळमळ होणे, उलट्या होणे, पोट फुगणे किंवा गॅस होणे यांसारख्या पचनाच्या समस्या उदभवू शकतात.
रक्तातील साखर वाढू शकते: केळ्यांमध्ये नैसर्गिक साखर असते, जी रिकाम्या पोटी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते.
आम्लपित्त आणि गॅसचा त्रास: काही लोकांना रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने आम्लपित्त आणि गॅसचा त्रास होऊ शकतो.
अतिरिक्त मॅग्नेशियम: रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने शरीरातील मॅग्नेशियमची पातळी वाढू शकते, ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
केळी खाण्याची योग्य पद्धत
केळी दूध, दही किंवा सुक्या मेव्यासह मिसळून खा. सकाळी रिकाम्या पोटी खाणे टाळा आणि नाश्त्यामध्ये त्यांचा समावेश करा. जर तुम्हाला आम्लपित्ताचा किंवा मधुमेहाचा त्रास होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
केळी खाण्याची योग्य वेळ
नाश्त्यानंतर किंवा नाश्ता करताना केळी खाल्ल्याने दुपारपर्यंत भूक लागत नाही. त्याचबरोबर कमी पिकलेल्या केळ्यामध्ये सुमारे तीन ग्रॅम फायबर असते आणि त्यामध्ये रेझिस्टंट स्टार्च असतो, जो लवकर पचत नाही. त्यामुळे जास्त काळ पोट भरलेले राहते आणि पचनास मदत होते. त्याशिवाय केळ्यामध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी६ भरपूर प्रमाणात असते; जे ऊर्जा, चयापचय व रोगप्रतिकार शक्तीलादेखील समर्थन देते.
Disclaimer: हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. तो एक व्यावसायिक सल्याचा पर्याय, निदान किंवा उपचार नाही. तुम्हाला कोणताही आजार असल्यास, कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच कोणताही निर्णय घ्या.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.
Read Also,
