Car AC Tips: उन्हाळा सुरू झाला आहे. या काळात घर असो किंवा गाडी एसी लावणं हे आवश्यक असतं. तुम्ही दूरचा प्रवास करत असाल तर अशावेळी उन्हाळ्यात गाडीमध्ये एसी लावणं हे अनिवार्य होतं. कारण प्रचंड ऊन असल्यामुळे गाडी तापते. ज्यामुळे आत बसणं हे कठीण होतं. पण एसी ऑन केला तर मग गाडीला इंधन खुप लागतं. आज आपण जाणून घेऊया की, तुम्ही कारमध्ये 1 तास एसी ऑन केला तर तुमचं किती पेट्रोल खर्च होतं.
Car AC Tips
एक तास कार एसी लावल्यास किती इंधन खर्च होतं?: कारचं एयर कंडीशनर थेट इंजिनच्या बेल्डच्या माध्यमातून चालत असते. तुम्ही एसी ऑन करता, तेव्हा इंजिनवर एक्स्ट्रा लोड पडतो. ज्यामुळे गाडीला इंधन हे जास्त लागतं.
विशेषज्ञ आणि ऑटोमोबाईल टेस्ट्सनुसार एक सामान्य 1.2 लिटर ते 1.5 लिटर इंजिनची कार पार्क केली असेल तर याचं एयर कंडीशनर 1 तास चालू राहिल्यास ही कार सरासरी 0.6 लिटर ते 1.2 लिटरपर्यंत पेट्रोल खर्च करते. इंधनाचा हा वापर तुमच्या कारची इंजिन क्षमता आणि बाहेरच्या तापमानावर अवलंबून असते.
किती इंधन खाते कार?: SUV किंवा 2-लिटर किंवा त्यापेक्षा मोठ्या इंजनची पॉवरफूल कारमध्ये AC एक तास चालवल्यास जवळपास 0.5 ते 0.7 लिटर पेट्रोल खर्च होऊ शकतं. तर 1.2 ते 1.5 लिटर इंजिनची हॅचबॅक आणि सेडान कार एक तासात जवळपास 0.2 ते 0.4 लिटर पेट्रोल खर्च करतात.
हे जरूर वाचा:- Hands-free car kit - पुरानी कार को स्मार्ट बनाएं मिनटों में! ये गैजेट देखकर चौंक जाएंगे आप!
उभी गाडी आणि चालत्या गाडीत फरक काय?: गाडी चालू असते तेव्हा एसी चालवल्याने मायलेजमध्ये हे जवळपास 5% ते 15% टक्क्यांचा फरक पडतो म्हणजे कमी इंधन खर्च होते. पण उभ्या गाडीचा विषय वेगळा असतो. उभ्या गाडीत इंजन फक्त एसी कंप्रेसर आणि अल्टरनेटर चालवण्यासाठी काम करत असतो. यामुळे प्रति तासाचा वापर जास्त असतो. तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकला असाल तर 1 तास एसी चालवणं तुम्हाला 60 ते 110 रुपयांत पडू शकतं. हे सध्याच्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर आधारित आहे.
मायलेज कमी होण्याची कारणं?: तुम्हाला वाटत असेल की, एसी चालवल्याने मायलजे खुप कमी होतं. तर यामागे फक्त एसी हेच कारण नाही. एसीचं फिल्टर खराब होणं किंवा एसीचा गॅस कमी झाल्याने कंप्रेसरवर एक्स्ट्रा लोड येतो. ज्यामुळे इंजिन जास्त इंधन खर्च करतं. यासोबतच टायर प्रेशर कमी झाल्याने किंवा इंजिन ऑइलची खराब क्वालिटीही एसीसह मिळून मायलेज 20-25% कमी करतो. ज्याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होतो.
पेट्रोलचा वापर हा दुसऱ्या कारणांवरही अवलंबून असतो. कार उभी असते आणि एसी चालू असतो तेव्हा पेट्रोल जास्त लागतं. तर चालत्या कारमध्ये पेट्रोल थोडं कमी लागतं. एसी इंजिनकडून पॉवर घेते. ज्यामुळे इंजिनवर जास्त दबाव पडतो आणि इंधनाचा वापर जास्त वाढतो.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.
Read Also,
