Indian Army dog Tyson: जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात भारतीय लष्कराने रविवारी दहशतवाद्यांची शोधमोहीम राबवली. या मोहिमेत सहभागी झालेल्या टायसन नावाच्या एका जर्मन शेफर्ड श्वानाने शत्रूंची गोळी आपल्या अंगावर झेलली. जखमी अवस्थेतही त्याने हार न मानता दहशतवाद्यांचा पाठलाग करून त्यांची अचूक ठिकाणे शोधून काढली. टायसनने दाखवलेल्या या धाडसाला अनेकांनी सलाम केला असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या घटनेमुळे दहशतवाद विरोधी मोहिमांमध्ये लष्करी श्वानांच्या योगदानाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने राबविलेली ‘ऑपरेशन त्राशी-१’ ही मोहीम काय आहे? टायसनने या मोहिमेत नेमकी कशी मदत केली? त्याविषयीचा हा आढावा…
Indian Army dog Tyson
टायसनने लष्कराला कशी मदत केली?
टायसन हा जर्मन शेफर्ड जातीचा स्निफर डॉग असून तो भारतीय लष्करातील विशेष पथकाबरोबर कार्यरत आहे. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढण्यास त्याने लष्कराला रविवारी मोठी मदत केली. यावेळी झालेल्या चकमकीदरम्यान टायसनच्या पायाला गोळी लागली; परंतु वेदनांची पर्वा न करता त्याने शत्रूंची ठावठिकाणे शोधून दाखवली. दहशतवादी घनदाट झुडपांमध्ये लपून बसल्यामुळे त्यांचा शोध घेण्यास सुरक्षा दलाला मोठ्या अडचणी येत होत्या; पण टायसनने त्यांचे ठिकाण शोधून काढल्यामुळे शत्रूंचा खात्मा करण्यास मदत झाली, अशी माहिती भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. टायसनला उपचारासाठी हेलिकॉप्टरद्वारे उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याने यापूर्वीही अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये सहभाग घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
‘ऑपरेशन त्राशी-१’ मोहीम काय आहे?
जम्मू-काश्मीरच्या डोडा-किश्तवाड पट्ट्यातील छत्रू जंगल परिसरात काही दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली होती. या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांनी ‘ऑपरेशन त्राशी-१’ ही लष्करी मोहीम सुरू केली. यादरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सुरक्षा दलांना यश आले. त्यापैकी एक जण पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा वरिष्ठ सदस्य सैफुल्ला होता. गेल्या दोन वर्षांपासून तो भारतीय जवानांना चकवा देऊन आपले ठिकाण बदलत होता. या कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी दोन एके-४७ रायफल्स, मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि अन्य साहित्य जप्त केले आहे. त्याबाबतची माहिती लष्कराच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून देण्यात आली आहे. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी ‘ऑपरेशन त्राशी-१’ अंतर्गत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करून त्यांच्याकडील शस्त्रसाठा जप्त केला, असे लष्कराच्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
हे जरूर वाचा:- Picnic Spot in Maharashtra: बापरे इतने गजब के Picnic Spot.
दहशतवादविरोधी कारवायांमध्ये श्वानांचे योगदान
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्धच्या लढाईत भारतीय लष्कराचे श्वान पथक नेहमीच अग्रभागी राहिले आहे. टायसनने गाजवलेल्या शौर्याच्या निमित्ताने जवानांचे प्राण वाचवण्यासाठी काही शूर श्वानांनी दिलेल्या बलिदानाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. ऑक्टोबर २०२४ मध्ये जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ‘फँटम’ या बेल्जियन मॅलिनॉइस श्वानाने आपल्या प्राणाची आहुती दिली होती. मे २०२० मध्ये जन्मलेला फँटम ऑगस्ट २०२२ पासून लष्करात तैनात होता. दहशतवाद्यांचा माग काढत असताना त्याला शत्रूची गोळी लागल्याने वीरमरण आले होते.
जुलै २०२२ मध्ये ‘अॅक्सेल’ श्वान शहीद
जुलै २०२२ मध्ये ‘अॅक्सेल’ या जर्मन शेफर्ड श्वान दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाला. बारामुल्ला येथे २९ राष्ट्रीय रायफल्सच्या दहशतवादविरोधी मोहिमेत त्याला शत्रूंची गोळी लागली. जखमी अवस्थेतही अॅक्सेलने लपून बसलेल्या दहशतवाद्यांचे अचूक ठिकाण शोधून काढले आणि परिसरातील मशिदीचे संरक्षण करण्यात मदत केली. एक्सलला शत्रूंवर हल्ला करण्याचे आणि पाठीवर कॅमेरा घेऊन टेहळणी करण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. ऑक्टोबर २०२२ मध्ये ‘झूम’ या दोन वर्षीय बेल्जियन शेफर्ड श्वानाने दाखवलेल्या शौर्याची गाथा संपूर्ण देशात व्हायरल झाली होती. अंगावर दोन गोळ्या लागलेल्या असतानाही झूमने दहशतवाद्यांशी आपला लढा सुरूच ठेवला होता. शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांनी या शूर सैनिकाला वीरमरण आले. दहशतवाद्यांचा सामना करताना त्याने अनेक जवानांचे प्राण वाचवले होते.
हे जरूर वाचा:- Nilavanti Granth: जिसे पढ़ने पर मिलती है दौलत या मौत.
मानसी श्वानाच्या शौर्याची गाथा
लॅब्रेडॉर जातीची ‘मानसी’ आणि तिचा सांभाळ करणारे भारतीय सैन्यदलाचे जवान बशीर अहमद वार यांची जोडी आजही लष्कराच्या इतिहासात अजरामर आहे. ऑगस्ट २०१५ मध्ये बशीर अहमद हे पाकव्याप्त काश्मीरला लागून असलेल्या तांगधर सेक्टरमध्ये घुसखोरांचा मागोवा घेत असताना त्यांच्याबरोबर असलेल्या मानसीला शत्रूची चाहूल लागली. तिने जोरजोराने भुंकायला सुरुवात करताच दहशतवाद्यांनी अंदाधूंद गोळीबार केला. या गोळीबारात मानसी गंभीररित्या जखमी झाली. जीवापाड जपलेल्या लाडक्या श्वानाला रक्ताच्या थारोळ्यात पाहून बशीर अहमद यांना संताप अनावर झाला. त्यांनी घुसखोरांवर एकापाठोपाठ एक गोळ्या झाडण्यास सुरुवात केली; पण या चकमकीत त्यांनाही वीरमरण आले. मानसी ही मरणोत्तर युद्ध सन्मान मिळवणाऱ्या पहिल्या श्वान सैनिकांपैकी एक ठरली. दहशतवादविरोधी कारवायांमध्ये या श्वानांनी दाखवलेले धैर्य आणि निष्ठा भारतीय लष्कराच्या इतिहासातील प्रेरणादायी अध्याय मानले जातात.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.
Read Also,
