Header

Warren Buffett: गुंतवणूकदारांनी ३ दिवसांत गमावले १६ लाख कोटी रुपये; नुकसान टाळण्यासाठी लक्षात ठेवा वॉरेन बफेट यांनी सांगितलेल्या या ३ गोष्टी

Warren Buffett Investment Advice During Market Crash: इराणमध्ये अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे केलेल्या लष्करी कारवाईनंतर मध्यपूर्वेतील तणाव वाढला आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर मोठा नकारात्मक परिणाम झाला असून या आठवड्यात शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली आहे.


गेल्या पाच दिवसांत बीएसई सेन्सेक्स ३,६७८ अंकांनी घसरला आहे. तर एनएसई निफ्टी ५० निर्देशांक १,०२७ अंकांनी घसरला आहे. विश्लेषकांच्या मते, तेल पुरवठ्यातील व्यत्यय, वाढत्या कच्च्या तेलाच्या किमती आणि जागतिक अनिश्चिततेमुळे ही घसरण झाली.


Warren Buffett Investment Advice During Market Crash

Warren Buffett Investment Advice During Market Crash

या घसरणीमुळे मुंबई शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४.६३ लाख कोटी रुपयांवरून ४.४७ लाख कोटी रुपयांवर आले आहे. परिणामी गुंतवणूकदारांच्या १६.३२ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीचा चुराडा झाला आहे.

जगप्रसिद्ध गुंतवणूकदार आणि उद्योगपती वॉरेन बफे यांनी अनेक दशकांपूर्वीच, जेव्हा बाजार कोसळतो तेव्हा गुंतवणूकदारांनी काय करावे याबाबत भाष्य केले आहे.

शांत राहा आणि ‘पॅनिक सेलिंग’ टाळा

वॉरेन बफे नेहमी या गोष्टीवर भर देतात की, “शेअर बाजार अशा पद्धतीने काम करतो, जिथे ‘संयम’ ठेवणाऱ्या लोकांकडे पैसे हस्तांतरित होतात.”

बाजार कोसळत असताना भावनेच्या भरात येऊन निर्णय घेण्याबाबत ते सावध करतात. त्यांच्या मते, भीतीपोटी केलेली विक्री अनेकदा मोठ्या आर्थिक नुकसानीला कारणीभूत ठरते.

हे जरूर वाचा:- Ageless Body Book Summary in Marathi: कॅलेंडरचे वय विसरा, 'Ageless Body' मिळवा! डॉ. जितेंद्र अढिया यांच्या पुस्तकाची सविस्तर समरी

जेव्हा इतर लोक लोभी होतात तेव्हा सावध राहा आणि जेव्हा इतर लोक घाबरतात तेव्हा तुम्ही लोभी व्हा

वॉरेन बफे यांच्या सर्वात प्रसिद्ध आणि वारंवार सांगितल्या जाणाऱ्या वक्तव्यांपैकी हे एक वाक्य आहे. हे केवळ शब्दांचे चातुर्य नाही, तर त्यांच्या संपत्ती निर्मितीच्या रणनीतीचा हा मुख्य आधारस्तंभ आहे.

जेव्हा बाजार कोसळतो आणि बहुतेक गुंतवणूकदार गुंतवणूक काढून घेण्यासाठी धावपळ करत असतात, तेव्हा बफे मात्र गुंतवणूक वाढवण्यासाठी उत्सुक असतात.

२००८ च्या आर्थिक संकटाच्या काळात, जेव्हा बँकिंग क्षेत्रातील शेअर्स वेगाने कोसळत होते आणि अनेकजण आर्थिक व्यवस्था कोलमडण्याची भविष्यवाणी करत होते, तेव्हा बफे यांनी गोल्डमन सॅक्समध्ये ५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली. या एका व्यवहारामुळे त्यांची कंपनी बर्कशायर हॅथवेला ३ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नफा झाला.

दीर्घकालीन गुंतवणूक

वॉरेन बफे सातत्याने दर्जेदार कंपन्यांचे शेअर्स पोर्टफोलिओमध्ये टिकवून ठेवण्याचा आणि बाजारातील अल्पकालीन अस्थिरतेमुळे गुंतवणूक काढून घेण्याऐवजी दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करण्याचा सल्ला देतात.

बऱ्याचदा गुंतवणूकदार आपले सर्व पैसे बाजार तेजीत असताना गुंतवून टाकतात. पण जेव्हा बाजार कोसळतो आणि १,००० रुपयांचा शेअर ८०० रुपयांवर येतो, तेव्हा त्यांच्याकडे खरेदी करण्यासाठी पैसे नसतात. म्हणून, ‘कॅश रिझर्व्ह’ (रोख बचत) असणे म्हणजे युद्धाच्या वेळी पाठीशी अतिरिक्त दारूगोळा असण्यासारखे आहे, असे वॉरेन बफे म्हणतात.


जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.


Read Also,


Viral video: ‘लूट सको तो लूट लो’, बॉस ने 8000 कर्मचारियों को बोनस में दिया कैश, लेकिन रख दी ये एक शर्त



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.