Header

Ayurvedic Benefits of Bilva Patra - बेलाच्या पानांचे हे आहेत 5 जबरदस्त फायदे, आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर.

Ayurvedic Benefits of Bilva Patraभगवान शंकराची पूजा करण्यासाठी बेलाच्या पानांचा अधिक वापर केला जातो. बहुतेक जण बेलपत्र फक्त धार्मिक विधींशी जोडतात, परंतु आयुर्वेद आणि पारंपारिक भारतीय पाककृतींमध्ये सुद्धा बेलाच्या पानांना खूप महत्त्व आहे. बेल वृक्ष धार्मिकदृष्ट्या पवित्र मानला जातो कारण ते औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्याच्या पानांमध्ये आढळणारे नैसर्गिक संयुगे शरीराला थंड करण्यास, पचन सुधारण्यास, रक्तातील साखर संतुलित करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बेलपत्र विविध प्रकारे वापरले जाऊ शकते.


Ayurvedic Benefits of Bilva Patra - बेलाच्या पानांचे हे आहेत 5 जबरदस्त फायदे, आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर.

Ayurvedic Benefits of Bilva Patra

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकं नैसर्गिक आणि चविष्ट पदार्थ शोधतात. या संदर्भात बेलची पाने हा एक उत्तम पर्याय आहे. या लेखात, आरोग्य आणि चव दोन्ही देणाऱ्या बेलची पानांचा वापर आरोग्यासाठी कसा केला जाऊ शकतो ते जाणून घेऊयात.

बेलाच्या पानांचा हर्बल टी

अनेकांना बेलाच्या पानांचा हर्बल टी आवडतो. या हर्बल टी ची चव चांगली असतेच त्याचबरोबर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. आयुर्वेद तज्ञ सांगतात की हे हर्बल टी पचनासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यासाठी पचनाची समस्या दूर करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी हे हर्बल टी प्यावे. बेलाच्या पानांचा हर्बल टी बनवण्यासाठी 4 ते 5 ताजी बेलाची पाने धुवून घ्या. आता एक ग्लास पाण्यात ही पाने टाकून 5 ते 7 मिनिटे उकळवा. त्यानंतर तयार हर्बल टी मध्ये तुम्ही थोडे मध किंवा लिंबाचा रस मिक्स करून सेवन करू शकता. यामुळे पोटातील गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. तसेच चयापचय देखील सुधारते.

बेलच्या पानांची चटणी देखील एक चांगला पर्याय

बाजारामध्ये बेलची पाने मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. तुम्ही त्याची चटणी बनवूनही ती खाऊ शकता. बेलाच्या पानांपासून तयार चटणी चविष्ट आणि आरोग्यदायी दोन्ही आहे. तर चटणी बनवण्यासाठी बेलची पाने, धणे, पुदिन्याची पाने, आले, हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस आणि थोडेसे खडे मीठ हे सर्व मिश्रण एकत्र करून वाटून घ्या. आता तयार चटणी योग्य प्रमाणातच खावी. ही चटणी खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत होते, भूक वाढते आणि उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यास मदत होते.

हे जरूर वाचा:- Top 5 Cashback Credit Cards: वर्षाला ₹२०,००० वाचवणारी बेस्ट कार्ड्स - संपूर्ण माहिती (2026)

बेलच्या पानांचा काढा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो

तुमची जर रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर तुम्ही बेलाच्या पानांचा काढा बनवून प्या. तज्ञांचे म्हणणे आहे की बेलाच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, सी, बी1, बी6, कॅल्शियम, फायबर आणि पोटॅशियम असे अनेक पोषक घटक असतात, जे बदलत्या ऋतूंमध्ये सर्दी आणि फ्लूपासून संरक्षण करण्यास मदत करतात. तर हा काढा बनवण्यासाठी बेलपत्र, तुळस, काळी मिरी आणि आले हे सर्व गोष्टी अंदाजे पाण्यात टाकून उकळवा. पाणी अर्धे झाल्यावर गाळून घ्या. जर चव खूप कडू असेल तर तुम्ही थोडे मध मिक्स करून या काढ्याचे सेवन करा.

बेलाच्या पानांची पावडर बनवा आणि वापरा

तुम्ही बेलाच्या पानांची पावडर देखील बनवू शकता आणि ही तयार पावडर बराच काळ साठवून ठेवता येते. तर बेलाच्या पानांची पावडर बनवण्यासाठी बेलाची पाने घ्या, ती कडक उन्हात वाळवा आणि नंतर बारीक पुड तयार करा. बेलाच्या पानांची पावडर उन्हाळ्यात वापरण्यासाठी उत्तम आहे. तसेच बेलाच्या पानांचा वापर शरीराला थंड ठेवण्यास मदत करते. म्हणून, उन्हाळ्यातील उष्णतेमध्ये किंवा उष्णतेच्या लाटेत, तुम्ही ही पावडर ताक किंवा दह्यामध्ये मिक्स करू शकता. यामुळे आम्लता कमी होते आणि पोटात जळजळ आणि जडपणापासून आराम मिळतो.

बेल पत्रा डिटॉक्स वॉटर

बेलची पाने डिटॉक्स वॉटर म्हणून देखील वापरली जाऊ शकतात. प्रथम, बेलची पाने रात्रभर पाण्याच्या बाटलीत टाकून ठेवा. सकाळी दिवसभर हे पाणी प्या. यामुळे शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. तज्ञांचा असा सल्ला आहे की गर्भवती महिला आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्यांनी बेलची पाने खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा, डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.)


जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.


Read Also,


Why is Hrithik Roshan using crutches? - हृतिक रोशनच्या 52 व्या वयातील कुबड्या वापरण्याचं गुपित; वाचा अभिनेता काय सांगितलं?


    


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.